*कोंकण एक्सप्रेस*
*किंजवडे – ठाकूरवाडी प्रशालेत शालेय दप्तर व शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न*
*शिरगांव : संतोष साळसकर*
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला बळ देण्यासाठी व त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याच्या उद्देशाने मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार यांच्या सौजन्याने जि. प. प्राथमिक शाळा किंजवडे ठाकूरवाडी येथे शालेय विद्यार्थी व शिक्षकांना शालेय दप्तर तसेच शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
हा उपक्रम कै. हरी गुणाजी पवार (आजोबा) यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सामाजिक बांधिलकी जपत करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
कार्यक्रमात नितीन पवार, भाई गावडे, अमित शहापुरे,यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देवून यथोच्च सत्कार करण्यात आले.यावेळी माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप परब, उपाध्यक्षा श्रीमती ऋतुजा परब, माजी विद्यार्थी संघाचे प्रतिनिधी प्रताप परब तसेच महालक्ष्मी बचत गटाच्या अध्यक्षा श्रीमती उर्मिला तळवडेकर, श्रीम.कविता तळवडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गोविंदराव जाधव यांनी केले. त्यांनी नितीनजी पवार साहेब यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, विद्यार्थ्यांना मिळणारी मदत त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असे सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले. शिक्षणासाठी केलेली मदत हीच समाजसेवेची खरी ओळख आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहशिक्षक महेश इंगोले यांनी केले.

