पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून नवीन कुर्लीतील विविध विकासकामांना गती

पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून नवीन कुर्लीतील विविध विकासकामांना गती

*कोंकण एक्सप्रेस*

*पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून नवीन कुर्लीतील विविध विकासकामांना गती*

*नवीन कुर्ली प्राथमिक शाळा दुरुस्तीच्या कामाचा जि. प. सदस्य मनोज रावराणे यांच्या हस्ते शुभारंभ*

*फोंडाघाट : संजना हळदिवे*

नवीन कुर्ली पुनर्वसन गावठाणातील प्रलंबित विकास कामे गेली अनेक वर्षे वेळोवेळी शासन दरबारी सांगून सुद्धा पूर्ण होत नसल्याकारणाने नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाने पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन ही विकासकामे लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी मागणी केली. त्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधित विभाग कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांसकडून प्रलंबित कामे मंजूर करून घेतली यामध्ये गटार दुरुस्ती, मुख्य नाला दुरुस्ती,रस्ते डांबरीकरण, समाजमंदिर दुरुस्ती, प्राथमिक शाळा दुरुस्ती, पाणीपुरवठा दुरुस्ती, स्ट्रीट लाईट बसविणे, ग्रामपंचायत कार्यालय बांधणे अशी कामे मंजूर करण्यात आली यापैकी आज नवीन कुर्ली गावातील प्राथमिक शाळा दुरुस्ती कामाचा शुभारंभ जि.प. सदस्य मनोज रावराणे यांच्या शुभहस्ते पार पडला. या वेळी सतत सुरू असलेली विकासकामे पाहता ग्रामस्थांकडून पालकमंत्री नितेश राणे साहेब यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमित दळवी, नवदुर्गा युवा मंडळाचे अध्यक्ष अरूण पिळणकर, तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप कामतेकर, बूथ अध्यक्ष अतुल डऊर, मुख्याध्यापिका रेणुका जोशी, कृष्णा परब, सखाराम हुंबे, प्रशांत दळवी, शिवराम राणे, बाळकृष्ण चव्हाण, आशिष पेडणेकर, पांडुरंग चव्हाण, अरुण पाटील, शिवाजी तावडे,सचिन परब, प्रदीप आग्रे, अरुण पवार, शिवाजी चव्हाण, महादेव ऐंडे, अनंत दळवी, केशव दळवी, पांडुरंग कोलते, महादेव येंडे, विजय कोलते, मंगेश मडवी, सुनील गोसावी, जयेश चव्हाण, संतोष हसणेकर, संदेश सुतार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!