कणकवली तालुका वैश्य समाजातर्फे १२ जुलैला गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा

कणकवली तालुका वैश्य समाजातर्फे १२ जुलैला गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवली तालुका वैश्य समाजातर्फे १२ जुलैला गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा*

*कणकवली ः संजना हळदिवे*

कणकवली तालुका वैश्य समाजाच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरव सोहळा रविवार, १२ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता भालचंद्र महाराज संस्थान, कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्यात चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणारे विद्यार्थी, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी, दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणारे विद्यार्थी तसेच डॉक्टर, वकील, इंजिनिअर, सीए, पीएच.डी., एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी. यांसारखे उच्च शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यात येणार आहे.

समाजातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान व्हावा आणि इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कणकवली तालुका वैश्य समाजातील दहावीमध्ये किमान ८० टक्के, बारावीमध्ये किमान ७० टक्के गुण मिळविलेले तसेच उच्च शिक्षण पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी १० जुलै २०२६ पर्यंत आपले गुणपत्रक व संपर्क क्रमांक सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. गुणपत्रके श्री. निवृत्ती धडाम यांच्या झेंडाचौक, कणकवली येथील दुकानात जमा करावीत. अधिक माहितीसाठी श्रीमती निलम धडाम यांच्या ९४२३८८४४९६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

या गौरव सोहळ्यास पालक, समाजबांधव, हितचिंतक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कणकवली तालुका वैश्य समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!