*कोंकण एक्सप्रेस*
*महाराष्ट्राचे विधानसभेची सभापती श्री राहुल नार्वेकर यांच्याशी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांनी दीर्घकाळ व विकास कामावरती चर्चा*
*सावंतवाडी : प्रतिनिधि*
महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सभापती कोकण व सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी चे सुपुत्र मा.श्री राहुलजी नार्वेकर हे सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी शहरामध्ये आपल्या निवासस्थानी आले असताना त्यांची सदिच्छा भेट ही जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांनी घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्याचे स्वागत करण्यात आले
यावेळी संस्थानचे युवराज लखन राजे सावंत भोसले तसेच सामाजिक कार्यकर्ते व भाजपचे नेते दिलीप भालेकर तसेच शिंदे सेनेचे संयोजक श्री प्रतीक बांदेकर भाजप चे संयोजक श्री नागेश जगताप तसेच श्री.महेश बांदेकर श्री सुदेश नेवगी तसेच अनेक कार्यकर्ते यांनी स्वागत समारंभाच्या समयी उपस्थित होते
यावेळी महाराष्ट्राचे विधानसभेची सभापती श्री राहुल नार्वेकर यांच्याशी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांनी दीर्घकाळ व विकास कामावरती तसेच महाराष्ट्रातील आरोग्य समस्या बाबत चर्चा केली
त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा झाल्यानंतर आपल्या जिल्ह्यातील उद्योजकांना तसेच तरुण युवकांना रोजगार कसा मिळेल याबाबत सविस्तर चर्चा राजू मसुरकर यांनी करून तसेच निवेदन देऊन आपण कोकणातील व सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडीतील सुपुत्र असल्याने याबाबत योग्य ती समस्या सोडवा असे निवेदन मा. राहुलजी नार्वेकर यांना दिले आहे
अशी माझी व सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची इच्छा आहे असे मसूरकर यांनी राहुल जी नार्वेकर यांना सांगण्यात आले

