९ वर्षांनंतर 1986-87 बॅचचा स्नेहमेळावा – श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे….

९ वर्षांनंतर 1986-87 बॅचचा स्नेहमेळावा – श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे….

*कोंकण एक्सप्रेस*

*९ वर्षांनंतर 1986-87 बॅचचा स्नेहमेळावा – श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे….*

*दोडामार्ग : शुभम गवस*

पिकुळे – श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालयाच्या एस्.एस्.सी. बॅच 1986-87 चा स्नेहमेळावा १७ मे २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल ३९ वर्षांनंतर आयोजित झालेल्या या मेळाव्यासाठी माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी अतिशय उत्सुक होते.
सर्वजण “चंदू रॉयल पालम्स” येथे एकत्र जमले आणि कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. प्रतिमेस पुष्पहार श्री. अनंत शेटकर यांनी घालून, दीपप्रज्वलन सौ. आशा, सौ. मालिनी, सौ. कविता, सौ. विश्रांती व जेष्ठ वर्गबंधू कृष्णा सावंत यांनी केले. प्रास्ताविक सौ. विश्रांती गवस यांनी केले, तर स्वागत श्री. सुनिल गवस यांनी केले.
स्वागत समारंभानंतर दिवंगत माजी विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यामध्ये सुरेश भोजू गवस, राजेंद्र रामा गवस, रामा फटी घोगळे, तुकाराम भिकाजी नाईक, अनिल जयराम नाईक, श्रीकृष्ण भीवा चारी, नारायण सिताराम गवस यांचा समावेश होता.
उपस्थित माजी विद्यार्थी-विद्यार्थिनीनी आपल्या मनोगतातून आठवणी उजाळा दिला व अनुभव मांडले. कार्यक्रमात सुनिल गवस, अनंत शेटकर, महानंद गवस, शिवाजी गवस, प्रभाकर गवस, महादेव नाईक, संजय नाईक, भोजु ठाकूर, अर्जुन गवस, अनिल गवस, सुरेश घोगळे, चंद्रशेखर गवस, रतन गवस, विजय गवस, कृष्णा सावंत, आशा गवस, कविता गवस, मालिनी घोगळे व विश्रांती गवस उपस्थित होते.
महादेव नाईक, महानंद गवस, शिवाजी गवस, अनंत शेटकर, सुनिल गवस व सुरेश घोगळे यांनी पुढील पिढीच्या होतकरू व गरजू विद्यार्थ्यांसाठी मदत करण्याचा संकल्प मांडला. यास सुरुवात म्हणून सर्वांनी दिवंगत नारायण सिताराम गवस यांच्या आईस आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेऊन लगेच सुपूर्त केला.
कार्यक्रमाची सांगता माजी विद्यार्थी तसेच गावचे माजी सरपंच श्री. अनंत शेटकर यांनी केली आणि उपस्थितांचे आभार मानले. मेळावा एक संस्मरणीय आणि उत्साही कार्यक्रम ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!