*कोंकण एक्सप्रेस*
*वाघेरी-रावराणेवाडी येथे ९ मे रोजी श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळाचा ५५ वा वर्धापन दिन सोहळा !*
*डबलबारी भजनाचा जंगी सामना व इतर कार्यक्रमांचे आयोजन*
*कणकवली ः संजना हळदिवे**
तालुक्यातील वाघेरी-रावराणेवाडी येथील ‘श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ’ आपल्या गौरवशाली परंपरेचे ५५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. या सुवर्णमयी वाटचालीनिमित्त शनिवार, दि. ९ मे २०२६ रोजी होळीचा चव्हाटा (मांड) येथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिवसभराचे धार्मिक कार्यक्रम:
या मंगलमयी सोहळ्याची सुरुवात सकाळी ८:३० वाजता श्री सत्यनारायण महापूजेने होईल. दुपारी १ ते ३ या वेळेत महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ ते ६ या वेळेत महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ होईल. तर ६:३० वाजल्यापासून स्थानिक सुस्वर भजनांची मेजवानी भाविकांना मिळणार आहे.
रात्री रंगणार डबलबारी भजनाचा जंगी सामना!
या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे रात्री १० वाजता ‘डबलबारी’ भजनाचा सामना होणार आहे. यामध्ये दोन नामवंत युवा बुवांमध्ये चुरस पाहायला मिळेल.
श्री कोटेश्वर प्रासादिक भजन मंडळ, हरकुळ बुद्रुक (बुवा सुजित परब)व
श्री दत्तगुरु प्रासादिक भजन मंडळ, कासार्डे (बुवा उदय पारकर)यांच्यात भजन सामना रंगणार आहे.
या डबलबारी सामन्यासाठी नामवंत वादक साथसंगत करणार आहेत. मंडळाच्यावतीने या सर्व कार्यक्रमांना बहुसंख्येने उपस्थित राहून तीर्थप्रसाद व भजनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

