*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवलीत कबड्डीचा थरार! माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते ‘भालचंद्र चषक २०२६’ चा शानदार शुभारंभ*
*कणकवली ः संजना हळदिवे*
सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन व कणकवली तालुका कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने ‘यंगस्टार मित्रमंडळ, कणकवली’ आयोजित ‘भालचंद्र चषक २०२६’ या जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ विद्यामंदिरच्या पटांगणावर झाला. या स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने श्रीफळ वाढवून उत्साही वातावरणात करण्यात आले.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अनेक राजकीय, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यामध्ये नगरसेविका मेघा गांगण, नगरसेवक स्वप्नील राणे, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, अमोल रासम, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष सागर राणे, बंटी तहसीलदार, अक्षय चव्हाण, रूपेश वाळके, रूपेश परब, रुचिर ठाकूर, अभी चव्हाण, संदेश आर्डेकर, नंदू वाळके, भैया आळवे, रुदरेश लाडगावकर, किरण सावंत, दीपक देऊळकर, तुषार मोरे, उदय यादव, प्रियांका कोरगावकर, ओमकार हळदिवे, आणि समीर कमलापुरे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
उत्कृष्ट सूत्रसंचालन आणि रसिकांचा उत्साह
या उद्घाटन समारंभाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन बाळू वालावलकर व हरेश सावंत यांनी केले. या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कणकवलीतील कबड्डीप्रेमी व क्रीडारसिक मोठ्या संख्येने पटांगणावर उपस्थित होते.

