तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला वेग; १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला वेग; १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

*कोंकण एक्सप्रेस*

*तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला वेग; १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश*

*मुंबई, ४ ऑगस्ट २०२६:*

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री दीपकभाई केसरकर यांच्या मागणीनुसार आणि उपस्थितीत, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी टप्पा-२ पाणीपुरवठा योजना आणि तिलारी पाणीपुरवठा योजना सौर उर्जेवर कार्यान्वित करणे (टप्पा-१) या महत्त्वाच्या योजना शासनाच्या नाबार्ड (NABARD) योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आदेशानुसार या योजनांचे प्रस्ताव शासनाच्या वित्त विभागाकडे सादर करण्याच्या अनुषंगाने ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.
बैठकीतील प्रमुख उपस्थिती
या बैठकीस खालील अधिकारी व मान्यवर उपस्थित होते:
मा. श्री. दीपक केसरकर (आमदार, सावंतवाडी विधानसभा)
अप्पर मुख्य सचिव, वित्त विभाग
अप्पर मुख्य सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग
सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग
मुख्य अभियंता (जीवन प्राधिकरण ठाणे) व अधीक्षक अभियंता (पनवेल)
सहाय्यक महाप्रबंधक, नाबार्ड पुणे
कार्यकारी अभियंता (महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सिंधुदुर्ग व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग) आणि इतर संबंधित अधिकारी.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय व निर्देश
कालावधी आणि प्रस्ताव: मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष सर्वेक्षण करून येत्या पंधरा दिवसांत नाबार्ड योजनेअंतर्गत मंजुरीसाठी शासनाच्या वित्त विभागाकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
स्थानिक गावांचा समावेश: सावंतवाडी तालुक्यातील मळगाव ब्राह्मणपाट, कुंभार्ली, सोनुर्ली आणि न्हावेली तसेच सावंतवाडी रेल्वे स्टेशनला पाणीपुरवठा करण्याबाबतच्या प्रस्तावित योजनांचा समावेश ‘वेंगुर्ला ते चिपी टप्पा-२’ अंतर्गत करून, १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले.
प्रकल्पाचे संभाव्य फायदे
पर्यटन व उद्योग क्षेत्राला चालना: या भागातील विविध उद्योगधंदे, हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटन व्यावसायिकांना पाण्याचा पुरवठा सुरळीत होईल. तसेच भविष्यात चिपी विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
पाणीटंचाई निवारण: दरवर्षी मार्च ते मे महिन्या दरम्यान किनारपट्टी भागातील गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या योजनेमुळे या गावांमधील पाण्याची गैरसोय कायमची दूर होणार आहे.
रेल्वे प्रवाशांसाठी सुविधा: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!