जागतिक पातळीवरील परीक्षेसाठी निशा केळकर हिची वैज्ञानिक निरीक्षक म्हणून निवड*

जागतिक पातळीवरील परीक्षेसाठी निशा केळकर हिची वैज्ञानिक निरीक्षक म्हणून निवड*

*कोंकण एक्सप्रेस*

*जागतिक पातळीवरील परीक्षेसाठी निशा केळकर हिची वैज्ञानिक निरीक्षक म्हणून निवड*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

मूळच्या वेंगुर्ला-खानोली येथील आणि सध्या रत्नागिरी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या कु. निशा केळकर हिची जागतिक स्तरावरील ऑलिंपियाड परीक्षेसाठी भारत सरकारतर्फे वैज्ञानिक निरीक्षक म्हणून निवड झाली आहे.

दरवर्षी इयत्ता बारावीमधील मुलांची देशस्तरावर परीक्षा घेऊन त्यातील पाच मुले जागतिक स्तरावरील ऑलिंपियाड परीक्षेसाठी निवडली जातात. ऑलिंपियाडमध्ये सहभागी होणा-या ७० ते ७५ देशातील मुलांची एकत्रित परीक्षा घेऊन त्यातून सुवर्णपदक, ब्रााँझ पदक इ. पुरस्कारासाठी मुलांची निवड केली जाते.

दरवर्षी ही परीक्षा वेगवेगळ्या देशामध्ये आयोजित करण्यात येते. यावर्षी या परीक्षेचे यजमानपद दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया या देशाकडे असून ४ ते १४ जुलै २०२६ या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. याच परीक्षेसाठी कु. निशाची निवड करण्यात आली आहे. भारतात ही परीक्षा मुंबई येथील होमीभाभा सायन्स सेंटरतर्फे घेतली जाते.

महाविद्यालयातील कामाबरोबरच कु. निशा ही होमीभाभा संस्थेत रिसोर्स पर्सन म्हणून गेली दहा ते बारा वर्षे काम करीत आहे. यासोबतच ती मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये पीएचडी करीत आहे. कु. निशा ही वेंगुर्ला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य के.जी.केळकर यांची ती भगिनी होय.

तिच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य आणि सर्व कर्मचारी वर्गाने तिचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!