श्री देव भैरव जोगेश्वरी मंदिर येथे जीर्णोद्धार व पुनःप्राणप्रतिष्ठा सोहळा ८ मे पासून

श्री देव भैरव जोगेश्वरी मंदिर येथे जीर्णोद्धार व पुनःप्राणप्रतिष्ठा सोहळा ८ मे पासून

*कोंकण एक्सप्रेस*

*श्री देव भैरव जोगेश्वरी मंदिर येथे जीर्णोद्धार व पुनःप्राणप्रतिष्ठा सोहळा ८ मे पासून*

*८ ते १० मे दरम्यान विविध धार्मिक विधी, कीर्तन, भजन, दशावतार नाट्यप्रयोग व ऐतिहासिक नाटकांचे आयोजन*

*१० मे रोजी शिखर कलश स्थापना व शिवउत्सव उत्साहात साजरा होणार*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आणि सहयाद्रीच्या कुशीत वसलेल्या श्री क्षेत्र शिवापूर गडकरवाडी नगरीत ८ ते १० मे २०२६ रोजी श्री देव भैरव जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार, पुनः प्राणप्रतिष्ठा व शिखर कलश स्थापना सोहळा श्री देव भैरव जोगेश्वरी मंदिर, शिवापूर, गडकरवाडी येथे विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाने मंगलमय वातावरणात संपन्न होत आहे.

शुक्रवार ८मे सकाळी ८.०० ते ८.३० वा.

प्रायश्चित्त विधी सकाळी ८.३० ते ९.०० वा.गाऱ्हाणे, प्रधान संकल्प, श्री गणेश पूजन, पुण्याहवाचन, नांदीश्राद्ध, आचार्य वरण सकाळी ९.०० ते १२.३० वा.

आचार्यकर्म, स्थल प्राकार शुध्दी, ब्रहमादी मंडळ, मुख्यदेवता स्थापन, भैरवादि देवतांची पूजा, चालनाविधी अंगभूत होम, तत्वोत्तारण, चालनविधी, बलिदान, पूर्णाहुती.सकाळी १२.३० ते १.३० वा.

शांतिहोम, गंगापूजन, सवाद्य गंगेचे आगमन, देवतांचा जलाधिवास.

दुपारी १.३० ते ३.३० वा. नैवेद्य, महाप्रसादसंध्या. ३.३० ते ६.३० वा.

ग्रामस्थ व गडकरी बांधव यांची सुश्राव्ये भजने संध्या. ६.३० ते ८.०० वा.

कीर्तन ह. भ. प. श्री. मनोज प्रभाकर खोचरे, घावनळे, कुडाळ रात्रौ. ८.०० वा.

सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्राची लोकधारा शनिवार दिनांक ९ मे

सकाळी ८.०० ते ९.०० वा.मंगलाचरण, शांतिपाठ, आचार्यकर्म प्राकारशुध्दी

सकाळी ९.०० ते ११.०० वा.

वास्तुमंडल, ब्रहृमादी मंडल,मुख्यदेवता स्थापना व पूजन,अग्नी स्थापना, ग्रहमंडळ स्थापन व पुजन

देवतांचा स्नानविधी.सकाळी ११.०० ते १.०० वा.देवतांचा शय्याधिवास, वास्तूयजन,ग्रहयजन, पर्याय होम

दुपारी १.०० ते १.३० वा.वास्तुपुजन स्थापनादुपारी १.३० ते ३.३० वा.

नैवेद्य, महाप्रसाद संध्या ३.३० ते ६.०० वा.ग्रामस्थाची व गडकरी बांधव यांची सुश्राव्ये भजने संघ्या ६.०० ते ७.३० वा. हरिपाठ संघ्या ७.३० ते ८.१५ वा.

श्री. संतोष राणे बुवा, वाडोस यांचे सुश्राव्य भजन संध्या ८.१५ ते ९.०० वा.

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

रात्रौ ९.०० ते ११.३० वा. कै. स्वतः मालक बाबी कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर यांचा ट्रिकसीनयुक्त, नाट्यप्रयोग -जोगुलांबा अर्थात कालसर्प भैरवी रविवार १० मे शिवप्रतिमा पुजन ७.४५ वा.सकाळी ८.०० ते १२.४५ वा.प्रातःस्मरण, शांतिपाठ, प्राकारशुध्दी, अवाहित देवतांचे पूजन, मुर्तिचे मधुपर्क पुजन, आग्न्यार्चन, तत्त्वहोम, शिखर कलश पुजनपूर्वक प्रतिष्ठा, ग्रुप स्थापन, बलिदान.सकाळी १२.४५ ते १.३० वा.

देवता स्थिर प्रतिष्ठापना, महापूजा, पूर्णाहुती अवभृत स्नान, आचार्यादि ऋत्विज पूजन, श्रेयोदान, दक्षिणा प्रदान, पुरोहित संभावना दुपारी १.३० ते २.०० वा.नैवेद्य, आरती, गाऱ्हाणे, आशीर्वाद

दुपारी २.०० ते ४.०० वा.

महाप्रसाद संध्या. ४.०० ते ८.०० वा.

ग्रामस्थ व गडकरी बांधव यांची सुश्राव्ये भजने रात्रौ. ८.०० ते १०.०० वा. सत्कार समारंभ रात्रौ. १०.०० वा.

ऐतिहासिक २ अंकी नाटक – व्यंकोजी वाघनाईक आदी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत हळदीकुंकू समारंभ ८,९,१० मे  या तीनही दिवशी होणार आहे.विशेष ११ मे रोजी होणारा शिवउत्सव यावर्षी पासून १० मे ला होणार आहे .सर्वांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सरनोबत, मानकरी अध्यक्ष व सचिव, श्री देव भैरव देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती शिवापूर-गडकरवाडी व अखिल ३०० गडकरी बांधव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!