न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या सुयश डाफळेची भारतीय सैन्य दलातील लेफ्टनंट पदी निवड

न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या सुयश डाफळेची भारतीय सैन्य दलातील लेफ्टनंट पदी निवड

*कोकण Express*

*न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या सुयश डाफळेची भारतीय सैन्य दलातील लेफ्टनंट पदी निवड

*फोंडाघाट ः प्रतिनिधी*

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स, व्होकेशनल अॅड सायन्स फोंडाघाट ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग. चा माजी विद्यार्थी कुमार सुयश बाजीराव डाफळे ची ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी, गया (बिहार) येथे भारतीय सैन्य दलातील लेफ्टनंट या पदाच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. त्याचे सेवापूर्व ट्रेनिंग प्रशिक्षण संस्था (एस.पी.आय.) छत्रपती संभाजीनगर येथे झाले. या यशाबद्दल फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी फोंडाघाटचे चेअरमन मा. श्री. सुभाष सावंत, सेकेटर श्री. चंद्रशेखर लिंग्रस, खजिनदार श्री. आनंद मर्य, शाळा समिती चेअरमन श्री. दत्तात्रय पवार व सर्व संस्था संचालक व प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सावंत एस. ए. व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी सुयशचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!