*कोकण Express*
*ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन कणकवली तालुका तर्फे*
*फोंडाघाट येथील कातकरी समाज बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य वाटप*
*कासार्डे ः संजय भोसले*
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन कणकवली तालुकाच्या वतीने आज २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संघटनेच्यावतीने फोंडाघाट येथील गरीब आणि गरजू आदिवासी पाड्यातील कातकरी समाज बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य वाटप करण्यात आले.
आपला भारत देश स्वतंत्र होऊन पाऊन शतक लोटले तरी अजूनही अनेक समाजबांधव स्वतःच्या व कुटुंबाच्या विकासापासून खूप वंचित आहेत.आर्थिक मागासलेपणा आहे,विकास काय असतो याची माहिती नाही.प्रचंड गरीबी,ना रोजगाराचे,ना उदरनिर्वाहाचे साधन त्यामुळे दोनवेळच्या जेवणाची भ्रांत आणि विकासापासून वंचित असणारे अनेक आदिवासी पाडे आपल्या जिल्ह्यात आहेत.
ज्या समाजात आपण वावरतो त्या समाजाचे काही तरी देणे लागतो.याच भावनेतून ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन कणकवली तालुकाच्या वतीने अत्यंत हालाकित जीवन जगणाऱ्या या समाजातील गरीब व गरजू लोकांना अन्नधान्य साहित्याचा पुरवठा करण्याचे निश्चित केले.आज फोंडाघाट येथील कातकरी समाजातील गरीब कुटुंबीयांना अन्नधान्य साहित्याचे वाटप करण्यात आले.
त्यावेळी उपस्थित ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक, जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर, कणकवली तालुका अध्यक्ष हनिफभाई पिरखान, उपाध्यक्ष संदेश बांदेकर, सचिव मनोज कुमार वारे, खजिनदार रुपेश खाडये, माजी उपाध्यक्ष प्रकाश नारकर, संतोष टक्के फोंडाघाट उपस्थित होते.

