*कोकण Express*
*कणकवली अर्बन निधी लिमिटेड कणकवली चा उद्घाटन सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा*
*प्रांताधिकारी सन्मा.श्रीम.वैशाली राजमाने यांनी कणकवली अर्बन निधी लिमिटेड चे केले विशेष कौतुक*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कणकवली अर्बन निधी लिमिटेड कणकवली चे उद्घाटन तहसीलदार सन्मा.श्री.आर. जे. पवार आणि प्रांताधिकारी सन्मा.श्रीम.वैशाली राजमाने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी या वित्तीय संस्थेचे विशेष कौतुक केले आणि या संस्थेच्या माध्यमातून अर्थिक साक्षरता वाढेल असे देखील सांगण्यात आले, निधी लिमिटेड हा भारत सरकार मान्यताप्राप्त जिल्ह्यातील पहिलीच शास्वत आणि विश्वासार्ह संस्था आहे असे ऍड.राजेंद्र रावराणे म्हणाले या कार्यक्रमावेळी संस्थेचे चेअरमन प्रा.हरीभाऊ भिसे, व्हाईस चेअरमन डॉ. सुभाष सावंत, सेक्रेटरी श्री.रंजन चव्हाण, खजिनदार श्री.प्रितम पारकर संस्थेच्या डायरेक्टर सौ. सुरेखा भिसे,सौ. युगंधरा सावंत, सौ.रुपाली चव्हाण, सौ.प्राची पारकर, गटविकास अधिकारी श्री. विजय चव्हाण,श्री. संदेश पारकर,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री.दीपक बेलवलकर, डॉ.विद्याधर तायशेटे, ऍड.श्री.राजेंद्र रावराणे, ज्येष्ठ पत्रकार श्री.अशोक करंबेळकर,अध्यक्ष जिल्हा पत्रकार संघ सिंधुदुर्ग श्री.अशोक जेठे, प्रा.निलेश महेंद्रकर, उद्योजिका सौ.लीना काळसेकर, समाजसेवक श्री.अमर पारकर, उद्योजक श्री.विशाल कामत, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष श्री.लवु पिळणकर, अभिनेते श्री.निलेश पवार, साहित्यिक श्री.महेश काणेकर, श्री.सर्वेश भिसे,उद्योजक श्री.राजा राजाध्यक्ष, सौ.विहा वाळके, सौ.प्रांजल राणे व इतर मान्यवर आणि सिंधुगर्जना पथकाचे सर्व सदस्य उपस्थित होते,सर्व मान्यवरांनी यानिमित्ताने शुभेच्छा दिल्या यावेळी सिंधुगर्जना पथकाच्या वादनाने कार्यक्रमात अजूनच रंगत आणली या कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे चेअरमन प्रा.हरीभाऊ भिसे यांनी मांडले यावेळी त्यांनी विनम्र व तत्पर सेवा देण्याचा प्रयत्न संस्थेमार्फत करणार व तळागाळातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना या संस्थेशी जोडणार असल्याचे सांगितले आणि संस्थेमध्ये शेअर्स घेण्यासाठी किंवा खाते चालू करण्यासाठी नोंदणी करून विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले तसेच आभार प्रा.निलेश महेंद्रकर यांनी मानले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते श्री. निलेश पवार यांनी केले.

