उपससपंच नवलराज काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

उपससपंच नवलराज काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

*कोंकण एक्सप्रेस*

*उपससपंच नवलराज काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम*

*कार्यक्रमाला सभापती सिद्धेश रावराणे यांनी हजेरी लावत दिल्या उपसरपंच काळे यांना शुभेच्छा*

*ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे व श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन*

*वैभववाडी – प्रतिनिधी*

ग्रुप ग्रामपंचायत सडूरे–शिराळे आयोजित गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा २०२५–२०२६ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नंबर 50 गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला सर्व सत्कारमूर्ती विद्यार्थी यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

जिल्हा परिषद शाळा बचाव मोहीम – करमाफी पत्र वितरण सोहळा संपन्न झाला
जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढावी व शाळा बंद होण्यापासून वाचाव्यात, या उद्देशाने नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना ग्रामपंचायतीमार्फत एका घराची एक वर्षाची संपूर्ण घरपट्टी माफ करण्याचा निर्णय सन २०२४–२५ या आर्थिक वर्षात संकल्पक मा. उपसरपंच नवलराज विजयसिंह काळे यांच्या पुढाकारातून घेण्यात आला होताया उपक्रमाचे हे दुसरे वर्ष असून, यावर्षी संबंधित पालकांना घरपट्टी करमाफी पत्राचे वितरण करण्यात आले.घरकुल लाभार्थींसाठी विशेष सुविधा मा. उपसरपंच नवलराज विजयसिंह काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात उत्पन्न दाखला काढून देण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित सर्व लाभार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला.गुणवंत विद्यार्थी सन्मानाची गौरवशाली परंपरा
सडूरे–शिराळे येथील ग्रामस्थांनी सन २०१७ च्या निवडणुकीत विद्यमान उपसरपंच नवलराज काळे यांची सदस्यपदी निवड केली. निवडून आल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत सभागृहासमोर सर्वप्रथम आपल्या गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला.
हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर सन २०१७–१८ मध्ये ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच नवलराज काळे यांच्या पुढाकारातून गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा मोठ्या दिमाखात आयोजित करण्यात आले
तेव्हापासून आज २०२६ पर्यंत हा उपक्रम दरवर्षी अविरतपणे सुरू आहे. यावर्षी आपल्या गावातील गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. या यशवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. जागृत लोकप्रतिनिधी म्हणून नवलराज काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली ८ वर्षे हा उपक्रम सातत्याने राबविणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. असे प्रतिपादन सभापती सिद्धेश रावराराणे यांनी केले.

वाढदिवसाचे औचित्य साजन श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट अँड पिरॅमिड हेल्थ संस्था यांच्या वतीने व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व जिल्हा डोळे तपासणी केंद्र सांगुळवाडी मेडिकल कॉलेज यांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी अनेक लाभार्थ्यांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला तसेच ग्रामपंचायत हद्दीतील चार जिल्हा परिषद शाळांना पाच बुद्धिबळचे सेट नवलराज काळे यांनी भेट म्हणून दिले.
या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती सिद्धेश,रावराणे सरपंच दीपक चव्हाण, उपसरपंच नवलराज काळे ग्रामपंचायत सदस्य विलास जंगम रोशनी बाणे, विशाखा काळे महेश जंगम दीपिका काटे तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल काटे पोलीस पाटील अक्षता जंगम प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय डॉ.अधिकारी महेंद्रकर अधिकारी व कर्मचारी सांगुळवाडी मेडिकल कॉलेजचे डॉक्टर्स अँड स्टूडेंट, पत्रकार तुषार शिंगाडे यांचे गुणवंत विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत कार्यालय येथे सभापती यांच्या प्रमुख उपस्थितीत नवल राज काळे यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला यावेळी सर्व मान्यवरांनी नवलराज काळे यांना शुभेच्छा दिल्या व ग्रामस्थांनी देखील शाल श्रीफळ देऊन शुभेच्छा दिल्या. नवल राज काळे यांनी विविध कार्यक्रम राबवून आपली वाढदिवस साजरे करण्याचा संकल्प कायम ठेवला आहे त्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत असून त्यांना सर्वजण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!