न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या कु.कृष्णाई रावराणे हिची राष्ट्रीय स्तरावर झेप

न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या कु.कृष्णाई रावराणे हिची राष्ट्रीय स्तरावर झेप

*कोंकण एक्सप्रेस*

*न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या कु.कृष्णाई रावराणे हिची राष्ट्रीय स्तरावर झेप*

*न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटसाठी सलग दुसऱ्या वर्षी ऐतिहासिक क्षण*

*फोंडाघाट: संजना हळदिवे*

*फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, व्होकेशनल ॲण्ड सायन्स फोंडाघाटच्या राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागातील कंपनी सार्जंट मेजर कृष्णाई नंदकिशोर रावराणे हिची दिल्ली येथे 31 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2026 या कालावधीत होणाऱ्या ऑल इंडिया थलसेना कॅम्प – फायरिंग कॉम्पिटिशनसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. कु.कृष्णाईच्या सुवर्णमय कामगिरीमुळे न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटने ऐतिहासिक कामगिरी करत सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे.मागील वर्षी प्रशालेच्या कु.मनस्या फाले हिने अशीच ऐतिहासिक कामगिरी करून श्रीगणेशा केला आणि राष्ट्रीय स्तरावरीलही सुवर्णपदक मिळवले होते. ही निवड न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज फोंडाघाट तसेच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची बाब ठरली आहे.
कृष्णाई रावराणे हिने आपल्या सातत्यपूर्ण मेहनतीच्या, शिस्तीच्या आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. गेल्या जून महिन्यापासून सुरू झालेल्या निवड प्रक्रियेत सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांमधून तिची सुरुवातीला निवड झाली. प्रत्येक टप्प्यावर आपल्या कौशल्याची प्रभावी छाप पाडत तिने पुढील निवडीत स्थान मिळवले.
कृष्णाईच्या या यशामागे 58 महाराष्ट्र बटालियन NCC, सिंधुदुर्गचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय राज सर AO ले. कर्नल मंडलिक सर, तसेच बटालियनमधील सर्व JCO, NCO आणि P I स्टाफ यांचे मोलाचे प्रशिक्षण लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने विविध शिबिरांमध्ये कठोर प्रशिक्षण घेतले. त्याचबरोबर न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज फोंडाघाटचे मा. मुख्याध्यापक श्री. प्रसाद पारकर, NCC विभागाचे एएनओ आर्या भोगले, मारुती लाड, क्रीडा शिक्षक अजिंक्य पोफळे यांचेही कृष्णाईला सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि कृष्णाईच्या अथक परिश्रमामुळे तिला प्रत्येक टप्प्यावर पुढे जाण्याची संधी मिळाली.
यानंतर कृष्णाईची अहमदनगर येथे आयोजित फायरिंग कॉम्पिटिशनसाठी निवड झाली. . अखेर या कठोर प्रशिक्षण व निवड प्रक्रियेतून तिने राष्ट्रीय स्तरावर झेप घेत दिल्ली येथे होणाऱ्या ऑल इंडिया थलसेना कॅम्प – फायरिंग कॉम्पिटिशनमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळवला आहे.
महाराष्ट्रातून फायरिंग कॉम्पिटिशनसाठी कृष्णाईची निवड होणे ही प्रशालेच्या दृष्टीने विशेष अभिमानाची बाब आहे. तिच्या या यशामुळे न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे.
या उत्तुंग यशाबद्दल कु.कृष्णाई आणि तिचे मार्गदर्शक शिक्षक सौ.ए.ए.भोगले, श्री.एम.डी.लाड.व श्री.ए.व्ही.पोफळे यांचे फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा.श्री.म.ज.सावंत, सेक्रेटरी मा.श्री.चं.शा.लिंग्रस, खजिनदार मा.श्री.वि.रा.तायशेटे, शाळा समिती चेअरमन मा.श्री.द.दि.पवार, मा.संचालक फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.पी.के.पारकर, पर्यवेक्षक श्री.व्ही.पी.राठोड सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, पालक आणि विद्यार्थी यांनी हार्दिक अभिनंदन केले आणि नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरीय शूटींग स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!