*विशेष आरोग्य शिबिर अभियानातून 7 हजारांहून अधिक नागरिकांना आरोग्य जनजागृतीचा लाभ*

*विशेष आरोग्य शिबिर अभियानातून 7 हजारांहून अधिक नागरिकांना आरोग्य जनजागृतीचा लाभ*

*कोंकण एक्सप्रेस*

*विशेष आरोग्य शिबिर अभियानातून 7 हजारांहून अधिक नागरिकांना
आरोग्य जनजागृतीचा लाभ*

*सिंधुदुर्गनगरी, दि. 7 (जिमाका) :*

अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व जयंतीनिमित्त वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि. 22 जुलै ते 1 ऑगस्ट 2026 या कालावधीत राज्यभर विशेष आरोग्य शिबिर अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे विविध आरोग्य तपासणी व विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
या अभियानाचा उद्घाटन सोहळा दि. 22 जुलै 2026 रोजी विधानसभा सदस्य दीपक केसरकर यांच्या हस्ते पार पडला. तसेच दि. 23 जुलै 2026 रोजी पालकमंत्री नितेश राणे यांनी शिबिरस्थळास भेट देऊन पाहणी केली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आयोजित विविध आरोग्य तपासणी शिबिरांचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. यामध्ये स्तन कर्करोग तपासणी शिबिरात 190, गर्भाशय व मुख कर्करोग तपासणी शिबिरात 89, बोन मिनरल डेन्सिटी (BMD) तपासणी शिबिरात 188 आणि नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात 241 रुग्णांनी लाभ घेतला.
नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिरांतर्गत 28 रुग्णांवर मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच आयोजित रक्तदान शिबिरात नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागातून एकूण 293 रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.
आरोग्य शिबिराच्या कालावधीत विविध संस्थांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली. बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग व फिजिओथेरपी, कुडाळ तसेच श्री. पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी व कॉलेज ऑफ नर्सिंग, वाडीहुमरमळा आणि ग्रामीण रुग्णालय, मालवण व ग्रामीण रुग्णालय, पेंडूरकट्टा येथे विविध आरोग्य विषयांवर जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.
यामध्ये स्थूलता, हर्निया, व्हेरिकोज व्हेन्स, मुख कर्करोग, थॅलेसेमिया, टाइप-१ डायबेटीस मेलिटस, मानव दूध बँक (Human Milk Bank), कृत्रिम अवयव व पुनर्वसन, हृदयविकार तसेच असंसर्गजन्य आजार (NCD) याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
00000000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!