आषाढी एकादशीनिमित्त कलमठमध्ये कार्यक्रम

आषाढी एकादशीनिमित्त कलमठमध्ये कार्यक्रम

*कोंकण एक्सप्रेस*

*आषाढी एकादशीनिमित्त कलमठमध्ये कार्यक्रम*

*कणकवली : प्रतिनिधी*

कलमठ बाजारपेठ येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात शनिवार २५ जुलै रोजी आषाढी एकादशी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी केली जाणार आहे. २५ रोजी सकाळच्या सत्रात धार्मिक विधी पार पडणार आहेत. दिवसभर पारायण, भजन होईल. दरम्यान, आषाढी एकादशीनिमित्त २४ ते २९ जुलै या कालावधीत दररोज सायंकाळी ७.३० वा. पालखी काढण्यात येईल. तरी भाविकांनी या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन विठ्ठल रखुमाई मंदिर व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!