*कोंकण एक्सप्रेस*
*तेली समाज उन्नती मंडळातर्फे गुणगौरव*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळ वेंगुर्ला शाखेतर्फे रविवार दि.२६ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता वेंगुर्ला-भटवाडी येथील वैभव तुळसकर यांच्या निवासस्थानी दहावी, बारावी व स्पर्धा परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विद्याथ्र्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला आहे. या गुणगौरव सोहळ्यास पात्र असलेल्या दहावीत ८० टक्के आणि बारावीत ७० टक्के तसेच स्पर्धा परीक्षेत विशेष प्राविण्य धारकांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत २४ जुलैपर्यंत कॉलिटी कोल्ड्रींक्स, दाभोली नाका, वेंगुर्ला या ठिकाणी जमा करावी. या समारंभास विद्यार्थी, पालक आणि समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समाज मंडळाचे वेंगुर्ला तालुका अध्यक्ष सुनिल नांदोसकर आणि सचिव विद्याधर वरसकर यांनी केले आहे.

