स्व. अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सिंधुदुर्ग नगरीत विशेष आरोग्य शिबिर सुरू

स्व. अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सिंधुदुर्ग नगरीत विशेष आरोग्य शिबिर सुरू

*कोंकण एक्सप्रेस*

*स्व. अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सिंधुदुर्ग नगरीत विशेष आरोग्य शिबिर सुरू*

*जिल्ह्यातील जनतेने रुग्नानी या शिबीराचा लाभ घ्यावा – नितेश राणे*

*-सिधुदुर्गनगरी*

स्व. अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या या विशेष आरोग्य शिबिरामुळे जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्द होत आहे. महाराष्ट्र शासनाचा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. जिल्ह्यतील रुग्णाला अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करुन देणे आवश्यक असून याशिबीरातून आलेल्या डॉक्टर मशीनरीचा कॅन्सर अन्य रुग्नाना सेवा मिळत आहे त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले
सिधुदर्ग नगरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती पर वैद्यकीय विभागामार्फत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिराला भेट आणि तेथील रुग्णसेवेची पाहणी पालकमंत्री नितेश राणे यांनी केली व शिबीरासाठी आलेल्या रुग्नाची विचारपूस केली यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शुभागीसाठे , महाविद्यालयाचे अधिष्ठाता अनंत दवंगे ,जि.प. सदस्या सुप्रिया वालावलकर, जिल्हाशल्य चिकीत्सक डॉ.श्रीपाद पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, वैद्यकिय अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते .प्रारंभी स्व अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला .
यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ तसेच त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या आरोग्य अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाआहे .
चिपी नवि मुंबई विमानसेवा सुरु करण्याबाबत सर्व पूर्तता पूर्ण झाली आहे. लवकरच ही विमान सेवा सुरु होणार आहे असेही सांगीतले चिपीला उतरणाऱ्या पर्यटकासाठी वेगुर्ले मालवण देवगड विजयदुर्ग अशी बोटसेवा सुरु करणार असुन यासाठी जेटी बांधणे चे काम बंदर विभागामार्फत हाती घेतली आहे चिपी विमानतळावर उतरणाऱ्या पर्यटकाना बोट सेवेच्या माध्यमातून एक दिड तासाचा प्रवास १४ मिनीटावर येणार आहे या मुळे पर्यटन वाढीला प्रतिसाद मिळेल असेही पालकमंत्री नितेश राणे म्हणाले
यावेळी अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांनी विशेष आरोग्य शिबिर अभियानाची माहिती दिली. या अभियानांतर्गत नागरिकांसाठी विविध आरोग्य तपासण्या व उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये रक्तदान शिबिर, स्तन कर्करोग तपासणी, गर्भाशय व मुख कर्करोग तपासणी, बोन मिनरल डेन्सिटी (BMD) तपासणी, नेत्र तपासणी तसेच आवश्यक शस्त्रक्रिया यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार पुढील उपचार व शस्त्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामार्फत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.
यावेळी श्री आबिद नाईक यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या सामाजिक कार्याचा आणि जनसेवेप्रती असलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!