*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेची कुमारी कर्तृत्वा विनायक हरकुळकर तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांची मानकरी*
*कणकवली : संजना हळदिवे*
रोटरी क्लब ऑफ कणकवली. मार्फत कै. रो. दादासाहेब वुडतरकर यांच्या प्रथम स्मृती दिनांनिमित्त तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेची विद्यार्थीनी कुमारी कर्तृत्वा विनायक हरकुळकर हिने आपल्या अमोघ वक्तृत्वाने श्रोत्यांवर छाप पाडत द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली. रोटरीचे पदाधिकारी व मान्यवरांनी कु . कर्तृत्वा हरकुळकर हिचे शिल्ड प्रमाणपत्र व पुस्तक देवून गौरविण्यात आले . यावेळी विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री . पी. जे. कांबळे सर व रोटरीचे सर्व पदाधिकारी तसेच कै दादासाहेब कुडतरकर यांचे पुत्र श्री प्रशांत कुडतरकर उपस्थित होते या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. विजयकुमार सावंत सर सौ प्रिया सावंत मॅडम यांनी काम पाहिले

