*कोंकण एक्सप्रेस*
*पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरगाव परिसरातील शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप*
*शिरगाव : संतोष साळसकर*
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा देवगड-कणकवली-वैभववाडी मतदारसंघाचे आमदार ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमित साटम यांच्या सौजन्याने शिरगाव परिसरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत शिरगाव गावठण, आंबेखोल, निमतवाडी, राकसवाडी, शेवरे, हडपीड, चाफेड आदी ठिकाणांतील जिल्हा परिषद शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना वह्या व अन्य शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच चाफेड ग्रामपंचायतीचे सरपंच साहिल पांचाळ यांनी चाफेड येथील शाळेत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून उपक्रमात सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थितांनी आयोजकांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात अधिक सक्षम करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमित साटम, शिरगाव पंचायत समिती सदस्या शीतल तावडे, चाफेडचे सरपंच साहिल पांचाळ, उपसरपंच महेश राणे, विशाल राणे, माजी सभापती नंदू देसाई, ग्रा. पं. सदस्य सुनील कांडर, नागेश साळकर, मंगेश लोके, दाजी राणे, सुहास राणे, युधीराज राणे, यांच्यासह संबंधित शाळांतील शिक्षक, पालक, विद्यार्थी व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

