शिष्यवृत्ती परीक्षेत समृद्धी सोये चे सुयश

शिष्यवृत्ती परीक्षेत समृद्धी सोये चे सुयश

*कोंकण एक्सप्रेस*

*शिष्यवृत्ती परीक्षेत समृद्धी सोये चे सुयश*

*शहरी विभागात तृतीय क्रमांक मिळवत शिरगाव हायस्कूलचा नावलौकिक*

*शिरगाव : संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील शिरगाव हायस्कूल, शिरगाव येथील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कु. समृद्धी सत्यवान सोये हिने शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी विभागात तृतीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे शिरगाव हायस्कूलच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
समृद्धीने नियमित अभ्यास, मेहनत, जिद्द, चिकाटी आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांच्या जोरावर हे यश प्राप्त केले. तिला डी. एम. डवरी, के. व्ही. कदम, वाय. वाय. चव्हाण या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल पालक, शिक्षक, विद्यार्थी तसेच शिरगाव परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
समृद्धीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिरगाव हायस्कूल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुणभाई कर्ले , संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक, शाळा समितीचे चेअरमन विजयकुमार कदम, मानद अधीक्षक संदीप साटम, मुख्याध्यापक उदयसिंग रावराणे, तसेच इतर पदाधिकारी, सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
यावेळी तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देताना, समृद्धीने भविष्यातही असेच यश संपादन करून शाळेचे व आपल्या पालकांचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!