युवा महोत्सवात कर्ले महाविद्यालयाचे नेत्रदिपक यश

युवा महोत्सवात कर्ले महाविद्यालयाचे नेत्रदिपक यश

*कोंकण एक्सप्रेस*

*युवा महोत्सवात कर्ले महाविद्यालयाचे नेत्रदिपक यश*

*मुक अभिनयात जिल्हयात प्रथम : अंतिम फेरीसाठी निवड*

*शिरगांव : संतोष साळसकर*

सावंतवाडी येथे मुंबई विद्यापीठाअंतर्गत आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव २०२६ मध्ये पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीनी मुक अभिनय या प्रकारात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून नेत्रदिपक यश संपादन केले आहे.
मुंबई विद्यापीठाचा ५९ वा आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ८ ऑगष्ट रोजी पार पडला. देवगड तालुक्यातील शिरगांव येथील कर्ले महाविद्यालयाने पथनाट्य, मुकनाट्य, एकपात्री, वादविवाद, वक्तृत्व या स्पर्धांमध्ये विद्यार्थी सहभागी झाले होते. यातील मुक अभिनय या स्पर्धेत महाविद्यालयाला सिंधुदुर्ग जिल्हयात प्रथम क्रमांक मिळाला असून मुंबई येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. मुकनाट्य स्पर्धेत श्रावणी हिंदळेकर, दिक्षिता खाडये, वैष्णवी परब, कलिका पवार, पियुषा हिर्लेकर या विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या. त्यांना राजेंद्र बोडेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
विद्यार्थिनीनी मिळविलेल्या नेत्रदिपक यशाबद्दल संस्थाध्यक्ष अरुण कर्ले, सर्व संस्था पदाधिकारी व संचालक, महाविद्यालयाचे चेअरमन संभाजी साटम, मानद अधिक्षक सुधीर साटम, प्राचार्य समिर तारी सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!