रोजगारक्षम नव्हे तर रोजगारनिर्माते बना : प्राचार्य समीर तारी

रोजगारक्षम नव्हे तर रोजगारनिर्माते बना : प्राचार्य समीर तारी

*कोंकण एक्सप्रेस*

*कर्ले महाविद्यालयात करिअर कट्टा इंडक्शन अवेरनेस प्रोग्रॅम*

*रोजगारक्षम नव्हे तर रोजगारनिर्माते बना : प्राचार्य समीर तारी*

*शिरगाव : संतोष साळसकर*

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना केवळ रोजगारक्षम नव्हे तर रोजगारनिर्माते बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात राबविण्यात येणारा करिअर कट्टाच्या उपक्रम कौशल्य विकास, करिअर मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास, उद्योग संपर्क आणि उद्योजकता प्रोत्साहन या पाच प्रमुख आधारस्तंभांवर असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून युवापिढीसाठी दिपस्तंभासारखा मार्गदर्शक ठरणार आहे असे मार्गदर्शन प्राचार्य समीर तारी यांनी केले
शिरगांव येथिल पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयात ७ ऑगष्ट रोजी करिअर कट्टा इंडक्शन अवेरनेस प्रोग्रॅम प्राचार्य समीर तारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी करिअर कट्टाचे देवगड तालुका समन्वयक प्रा. अक्षता मोंडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या, शिक्षणाची सांगड कौशल्य, रोजगार आणि उद्योजकतेशी घालणारा करिअर कट्टा हा उपक्रम महाविद्यालयीन तरुणांच्या स्वप्नांना नवी उजळणी देणारा आहे. उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बदलत्या रोजगारविश्वाची गरज ओळखून आवश्यक कौशल्ये, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात येणार आहे.
५२ आठवड्यांची संवादमालिकेतून ५०हून अधिक अँड-ऑन कोर्सेस, आएएस अधिकारी व यशस्वी उद्योजकांशी संवाद, करिअर संसद, मधुमक्षिका क्रांती, कृषी-व्यवसाय व्यवस्थापन आणि बिझनेस फूड व्हॅन यांसारखे उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहेत. कृतीतून शिक्षण आणि उद्योजकतेची प्रेरणा हे या उपक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
करिअर संसद संसदेत महाविद्यालयातील ११ विद्यार्थी प्रतिनिधींची निवड करून त्यांच्यावर मुख्यमंत्री, नियोजन मंत्री, कौशल्य विकास मंत्री, उद्योजकता विकास मंत्री आदी जबाबदाऱ्या सोपविण्यात येतात. साप्ताहिक प्रशिक्षणातून नेतृत्व, निर्णयक्षमता, प्रशासन आणि टीमवर्कचे धडे विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.
शैक्षणिक वर्षात प्रत्येकी ४५ दिवसांचे सहा सत्रांमध्ये १२ अभ्यासक्रम आहेत. कृत्रिम बुद्धीमत्ता, डिजिटल प्रोफाइल बिल्डिंग, बौद्धिक संपदा हक्क, इमेज बिल्डिंग, शेअर मार्केटची मूलतत्त्वे, आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि वैयक्तिक आर्थिक नियोजन यांसारख्या विषयांचा त्यात समावेश आहे. विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता, व्यवसाय नियोजन, भावनिक बुद्धिमत्ता आणि स्टार्टअप संस्कृती विकसित केली जाणार आहे असे सांगितले
कार्यक्रमास महाविद्यालयाच्या अकॅडमिक कोऑरडीनेटर प्रा.सिद्धी कदम, करिअर कट्टा सहाय्यक समन्वयक प्रा. कोमल पाटील यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!