सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षेत फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या अर्णव राजाराम भिसे याचा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक

सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षेत फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या अर्णव राजाराम भिसे याचा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षेत फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या अर्णव राजाराम भिसे याचा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक*

*सीईओ रवींद्र खेबुडकर यांच्या हस्ते गौरव!*

*फोंडाघाट  : संजना हळदिवे*

युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या लोकप्रिय व प्रतिष्ठित अशा ‘सिंधुरत्न टॅलेंट सर्च’ (STS) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचा होतकरू विद्यार्थी अर्णव राजाराम भिसे याने इयत्ता ६ वी मधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून फोंडाघाटचे नाव रोशन केले आहे.
अर्णवच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सन्माननीय श्री. रवींद्र खेबुडकर साहेब यांच्या हस्ते त्याला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण बाहेर आणण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या परीक्षा महत्त्वपूर्ण ठरतात, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
अर्णवच्या या यशाने संपूर्ण फोंडाघाट परिसरात आणि शिक्षण वर्तुळातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याच्या या यशामागे शाळेतील शिक्षक आणि पालकांचे मार्गदर्शन लाभले असून, त्याच्या या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व स्तरातून त्याला शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!