सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या कु. पूर्वा मारुती लाड हिची उज्ज्वल कामगिरी

सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या कु. पूर्वा मारुती लाड हिची उज्ज्वल कामगिरी

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या कु. पूर्वा मारुती लाड हिची उज्ज्वल कामगिरी*

*माजी अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते सत्कार..!*

*फोंडाघाट : प्रतिनिधी*

युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘सिंधुरत्न टॅलेंट सर्च’ (STS) स्पर्धा परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून, यामध्ये फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, फोंडाघाट येथील इयत्ता ७ वी तील विद्यार्थिनी कु. पूर्वा मारुती लाड हिने गुणवत्ता यादीत ४१ वा क्रमांक पटकावून यश संपादन केले आहे.
कु. पूर्वा लाड हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. संजना सावंत मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते तिचा विशेष सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि आपली गुणवत्ता सिद्ध करावी, असे गौरवोद्गार यावेळी सौ. संजना सावंत यांनी काढले.
पूर्वाच्या या यशाबद्दल शाळा समिती, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग तसेचपालक आणि ग्रामस्थांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, पुढील शैक्षणिक वाटचालीसंदर्भात तिला सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!