सिंधुदुर्गात शासकीय रुग्णालयांमध्ये उत्कृष्ट वैद्यकीय सेवा; तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे राजू मसुरकर यांच्याकडून अभिनंदन

सिंधुदुर्गात शासकीय रुग्णालयांमध्ये उत्कृष्ट वैद्यकीय सेवा; तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे राजू मसुरकर यांच्याकडून अभिनंदन

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्गात शासकीय रुग्णालयांमध्ये उत्कृष्ट वैद्यकीय सेवा; तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे राजू मसुरकर यांच्याकडून अभिनंदन**सावंतवाडी : संजना हळदिवे*

गेल्या तीन महिन्यांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विविध शस्त्रक्रिया व वैद्यकीय प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडून रुग्णांना उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांसह जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी अभिनंदन व आभार व्यक्त केले.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. गिरीश चौगुले (जनरल सर्जन), डॉ. धीरज सावंत (स्त्रीरोगतज्ज्ञ), डॉ. भक्ती सावंत (स्त्रीरोगतज्ज्ञ) आणि डॉ. अंजना पी. (स्त्रीरोगतज्ज्ञ) यांच्यासह विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांवर यशस्वीपणे उपचार व शस्त्रक्रिया करून गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे.

तसेच सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्ह्यातील विविध शासकीय तालुका रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी रुग्णसेवेत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल मसुरकर यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

यावेळी कोल्हापूर विभागाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने, सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील, जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी सुबोध इंगळे, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्यानंद यांच्यासह सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, ऑपरेशन थिएटरमध्ये कार्यरत आरोग्य कर्मचारी तसेच जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयांतील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले.

गोरगरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना शासकीय रुग्णालयातून दर्जेदार उपचार मिळणे ही अत्यंत समाधानाची बाब आहे. विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया व वैद्यकीय प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवेचे उत्तम उदाहरण निर्माण केले आहे, असे राजू मसुरकर यांनी सांगितले.

“डॉक्टर आणि सर्व आरोग्य कर्मचारी यापुढेही अशीच निस्वार्थ व ईश्वरी सेवा गोरगरीब जनतेला देत राहोत. ईश्वराने सर्व डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, सुख-समाधान, ऐश्वर्य व समृद्धी प्रदान करावी,” अशी प्रार्थना जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी व्यक्त केली.

🛑डॉ. बाळसाहेब जोशी
नेत्र सेवा 4 5 3 12 –108नियमित
🛑डॉ. नेहा पावसकर नेत्र सेवा 20 30 58 108       –          – DMER
🛑डॉ. धनंजय भोसले नेत्र सेवा 46 1020 –DMER
     🇮🇳स्त्रीरोगतज्ज्ञांचे नाव🇮🇳
 ⛔डॉ. मीनल नागवेकर.
स्त्रीरोग सेवा प्रदान करणे1 33 7
  –        –
 ⛔डॉ. गायत्री पालेकर स्त्रीरोग सेवा प्रदान करणे 9 4 5 9
        –        –
 ⛔डॉ. प्रियांका म्हसकर
स्त्रीरोग सेवा प्रदान करणे 0 2 1 4 7 –
*
⛔डॉ. भक्ती सावंत
स्त्रीरोग सेवा प्रदान करणे02 4 2 8 11   –
 ⛔डॉ . संजय विळकर
स्त्रीरोग सेवा प्रदान करणे 0 11 10 8 29 22    –
 ⛔डॉ. नित्यानंद मसुरकर स्त्रीरोग सेवा प्रदान करणे – – – – – – नियमित
⛔डॉ. स्वप्नीली  माने.
  स्त्रीरोग सेवा प्रदान करणे – – – – – – नियमित
⛔डॉ. पद्मजा कुंभारवाड
स्त्रीरोग सेवा प्रदान करणे——नियमित
 ⛔डॉ. भावना तेलंग
स्त्रीरोग सेवा प्रदान करणे002 1 3 —
 ⛔डॉ. प्रितम जगताप
प्रशासकीय आणि स्त्रीरोग सेवा प्रदान करणे 117 16 34 57 -नियमित
 ⛔डॉ. गायत्री शर्मा
स्त्रीरोग सेवा प्रदान करणे 0 35 39 10 84 – नियमित
 ⛔डॉ. प्रियांका कासार
स्त्रीरोग सेवा प्रदान करणे030 22 20 72 -नियमित
🛑कान, नाक, घसा तज्ज्ञ विभाग🛑
  एप्रिल २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीत केलेल्या ENT (कान-नाक-घसा) शस्त्रक्रियांची संख्या
✴️कान, नाक, घसा तज्ज्ञांचे नाव✴️
 🛑डॉ. एस.व्ही. राणे कान-नाक-घसा 2 1 – 3 –
        –
🛑डॉ. समीर पोळे
कान-नाक-घसा000—कंत्राटी
  ⚛️जनरल सर्जन विभाग⚛️
 ⛔डॉ निखिल जाधव
जनरल सर्जरी 6 18 10 34 – – नियमित
⛔डॉ. अनिलजीत वज्राठकर
  जनरल सर्जरी 3 7 6 15 – – नियमित
⛔डॉ. महेंद्र आचरेकर
  जनरल सर्जरी 7 5 13 25 – – नियमित
 ⛔डॉ. गिरीश चौगुले
जनरल सर्जरी 25 47 83 155 625नियमित
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
    🇮🇳दंतवैद्यक विभाग🇮🇳
  एप्रिल २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीत केलेल्या दंत उपचारांची (Dental Procedures) संख्या दंत सेवा प्रदान करणे
🛑डॉ. समीर धाकोरकर
दंत सेवा प्रदान करणे9855 38 191 —
🛑डॉ. हुमायूं माने
दंत सेवा प्रदान करणे124148132404 -नियमित
🛑डॉ. संजय दिगंबर चाटे
  दंत सेवा प्रदान करणे 45 22 59 126 नियमित
आपला विश्वासू
राजेंद्र मसुरकर
जि. सिंधुदुर्ग ता. सावंतवाडी.
मोबाईल ९४२२४३५७६०
    जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान अध्यक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!