*कोंकण एक्सप्रेस*
*चाफेड गावच्या सरपंच पदी साहिल पांचाळ यांची बिनविरोध निवड*
*शिरगांव : संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील चाफेड ग्रा. पं. च्या सरपंचपदी साहिल मंगेश पांचाळ यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. चाफेड गावच्या इतिहासात सर्वात तरुण सरपंच म्हणून साहिल पांचाळ यांचे नाव घेतले जात आहे.
चाफेड ग्रामपंचायत चे माजी सरपंच कै. किरण मेस्त्री यांच्या आकस्मित निधनाने ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर उपसरपंच महेश राणे यांनी प्रभारी सरपंच म्हणून चांगल्या प्रकारे काम केले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत साहिल मंगेश पांचाळ यांचा सरपंच पदासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ते या निवडणुकीत बिनविरोध म्हणून निवडून आले.
दरम्यान नवनिर्वाचित सरपंच साहिल पांचाळ यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या कणकवली येथील निवासस्थानी भेट घेतली असता त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
नवनिर्वाचित सरपंच साहिल पांचाळ यांनी आज 21 मे रोजी सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, देवगड तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अमित साटम, उपसरपंच महेश राणे, माजी जि. प. सदस्य सुभाष नार्वेकर, ग्रा.पं. सदस्य सुनील कांडर, सुदर्शन साळकर, सौ. मानसी परब, माजी सरपंच संतोष साळसकर, आकाश राणे, चंद्रकांत साटम, सचिन मोडकर, महेश परब, ग्रामसेवक प्रथमेश देशमुख, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, देवगड तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अमित साटम, उपसरपंच महेश राणे यांनी नवनिर्वाचित सरपंच साहिल पांचाळ यांना शुभेच्छा देताना गावच्या विकास कामात सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे काम करा असे सांगितले. माजी सरपंच कै. किरण मेस्त्री यांनी आपल्या सरपंच पदाच्या कमी कालावधीत गावच्या विकासकामात चांगली धडाडी घेतली होती. त्यांचा हा वारसा पुढे साहिल पांचाळ यांनी चांगला चालवावा. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून या गावचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. असे ठाम मत जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी बोलताना सांगितले. यावेळी नवनिर्वाचित सरपंच साहिल पांचाळ यांनी संपूर्ण गावाने आपल्याला बिनविरोध म्हणून निवडून दिल्याबद्दल सर्वांचे विशेष आभार मानत यापुढे आपण सर्वाना सोबत घेऊन काम करून आपला संपूर्ण गाव एकसंघ कसा राहील याचा प्रयत्न करणार. असे सांगितले.

