*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवलीत 26 मेपासून ‘हॅप्पीनेस प्रोग्राम’चे आयोजन*
*आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने आयोजन ;जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारी ‘सुदर्शन क्रिया’ शिकविण्यात येणार..*
*कणकवली ः संजना हळदिवे*
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने कणकवली येथे 26 मे ते 31 मे दरम्यान ‘हॅप्पीनेस प्रोग्राम’ या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर मंगळवार ते रविवार दरम्यान दररोज सकाळी 6 ते 8.30 या वेळेत होणार आहे.
उत्कर्षा हॉल, कणकवली एसटी स्टॅन्ड समोर येथे होणाऱ्या या शिबिरात 18 वर्षांवरील सर्वांना सहभागी होता येणार आहे. या शिबिरामध्ये जगप्रसिद्ध आणि जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारी ‘सुदर्शन क्रिया’ शिकविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या शिबिरामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास, तणाव कमी होण्यास, मानसिक व भावनिक स्वास्थ्य सुधारण्यास तसेच सकारात्मकता आणि उत्साह वाढण्यास मदत होते. निरोगी, शांत आणि आनंदी जीवन जगण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या शिबिरासाठी इच्छुकांनी aolt.in/1017400 या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी उमेश – 9657479866, राखी – 9404944628, शंकर – 9422064681 आणि योगेश – 9975355387 यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.

