विद्यामंदिर कणकवलीच्या सान्वी रघुनाथ कारेकरला दहावीत 100 टक्के

विद्यामंदिर कणकवलीच्या सान्वी रघुनाथ कारेकरला दहावीत 100 टक्के

*कोंकण एक्सप्रेस*

*विद्यामंदिर कणकवलीच्या सान्वी रघुनाथ कारेकरला दहावीत 100 टक्के*

*कणकवली ः संजना हळदिवे*

सन 2025-26 मध्ये झालेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेत विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीचा निकाल 98.17 टक्के इतका लागला. सदर परीक्षेला प्रशालेचे 164 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 68 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत व 45 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.

प्रशालेच्या सान्वी रघुनाथ कारेकर या विद्यार्थिनीने 100 टक्के गुण मिळवत सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळवला. तसेच समृद्धी शंकर धुरी 98.20, चिन्मयी सुहास गुरव 98.20,गौरी सुनील खोचरे 98.20, वरदा दत्तप्रसाद मराठे 97.20, राशी संदीप राणे 96.60, प्रांजल जयवंत ठाकूर 96.00 गुण मिळवत सर्वांच्या कौतुकास पात्र ठरल्या. सदर यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली चे सर्व संस्था पदाधिकारी तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे, पर्यवेक्षक अच्युतराव वनवे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!