आंबोली मुख्य धबधब्यावर पायरी जवळ सर्प दंशामुळे झालेल्या 38 वर्षीय तरुणांच्या मृत्युंस बेजबाबदार प्रशासन जिम्मेदार

आंबोली मुख्य धबधब्यावर पायरी जवळ सर्प दंशामुळे झालेल्या 38 वर्षीय तरुणांच्या मृत्युंस बेजबाबदार प्रशासन जिम्मेदार

*कोंकण एक्सप्रेस*

*आंबोली मुख्य धबधब्यावर पायरी जवळ सर्प दंशामुळे झालेल्या 38 वर्षीय तरुणांच्या मृत्युंस बेजबाबदार प्रशासन जिम्मेदार..*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

आठवड्या भरापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंबोली यां ठिकाणी जाऊन स्वच्छतेच्या आणि सुरक्षेच्या बाबतीत आव्हान करत होत्या

यां कार्यक्रमाचे फोटो सेशन आणि व्हिडिओ सेशन फक्त प्रशासकीय कामकाज बातमी एव्हड्या साठीच होत कां..?

प्रशासन आता स्वतःवर जिम्मेदारी घेणार कां..?

आंबोली धबधब्यावर रविवारी कर्नाटक येथील पर्यटकाचा मुख्य धबधब्यावर झालेला मृत्यू हा वेदना दायक आहे

मुख्य धबधब्याजवळ दिवसभरात हजारो पर्यटक येतात
यां ठिकाणी धबधब्यावर जाताना 20 रुपये शुल्क घेतलं जातं यां शुल्काची
पावती देतांत त्यावर
वनविभाग सावंतवाडी
धबधबा पर्यटन उपद्रवं शुल्क रू. 20 असे छापील आहे

प्रत्येक नागरिकांसं 20 रुपयाची पावती देऊन शुल्क घेतल जाते या पावती वर
” उपद्रवं शुल्क ” असे बेजबाबदार शब्द छापील स्वरूपात आढळून येतात..

तिथे सुविधा देण्यासाठी शुल्क घेतलं त्याबाबत देखील काही आमचं म्हणणं नाही
परंतु त्याठिकाणी असलेल्या असुविधा आणि पावतीवर असलेला मजकूर हा प्रशासनाची नागरिकांबाबत असलेली बेफिकीर कर्तव्याची भूमिका दिसून येते

जिल्ह्यातील पावसाळ्यातील आकर्षण म्हणून आंबोली येथे नागरिक फिरायला येतात..

येणाऱ्या पर्यटक अथवा जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांकडून जे शुल्क घेण्यात येतं यां बदल्यात पर्यटक आणि जिल्ह्यातील स्थानिक नागरिक यांच्या सुरक्षेच काय..?

त्या ठिकाणी तुम्ही शुल्क आकारता तर तिथल्या सुरक्षेची जेम्मेदारी देखील प्रशासनाची आहे
मृत व्यक्तीला प्रशासनाने 50 लाख नुकसान भरपाई द्यावी

जिल्ह्यातील यां आल्हाददायक पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी जगभरातून नागरिक येतात
लाखोच्या संख्येत यां ठिकाणी कर जमा होतो हा कर घेताना जी पावती दिली जाते यावर
उपद्रवं शुल्क असे छापलेले आहे
प्रशासन यां पावती वरील मजकूरच्या माध्यमातून पर्यंटक नागरिकांच्या भावनेची चेष्टा करत आहे असं दिसून येतं आहे
प्रशासनाला भावना अथवा थोडी तरी लाज असेल तर किमान यां पावती वरील मजकूर आठवड्या भरात हटवावा
अन्यथा वनमंत्री आणि जिल्हा प्रशासन यांचा “उपद्रवं मंत्री उपद्रवी प्रशासन ‘” असा बोर्ड लावाणार

आपला

अरविंद मोंडकर
अध्यक्ष
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!