यशस्वी परंपरेचा ‘चौकार’! शंकर महादेव विद्यालय, कुंभवडे प्रशालेचा सलग २४ व्या वर्षी १०० टक्के निकाल

यशस्वी परंपरेचा ‘चौकार’! शंकर महादेव विद्यालय, कुंभवडे प्रशालेचा सलग २४ व्या वर्षी १०० टक्के निकाल

*कोंकण एक्सप्रेस*

*यशस्वी परंपरेचा ‘चौकार’! शंकर महादेव विद्यालय, कुंभवडे प्रशालेचा सलग २४ व्या वर्षी १०० टक्के निकाल*

*कणकवली ः संजना हळदिवे*

शंकर महादेव विद्यालय, कुंभवडे प्रशालेने आपल्या शिस्तबद्ध अध्यापनाची आणि यशाची परंपरा कायम राखत मार्च २०२६ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (SSC) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, प्रशालेचा निकाल सलग २४ व्या वर्षी १०० टक्के लागला असून, ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा या विद्यालयाने पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.

परीक्षेस बसलेले सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.

प्रथम.खुशी अमोल गोसावी 87

द्वितीय.राजदीप दीपक तेली 80.40

तृतीय.जयेश संदीप आचरेकर 77.20

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ (२४ वर्षे) निकालाची ही शंभर टक्क्यांची मालिका अविरत सुरू आहे.

या यशाबद्दल शाळेतील प्रथम तीन क्रमांकांच्या विद्यार्थ्यांचा व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेतील शिक्षक, पालक आणि संस्थेच्या मार्गदर्शनाला दिले आहे.

विद्यालयाच्या या ऐतिहासिक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय खासदार अरविंद सावंत साहेब, संस्था सचिव श्री.शशिकांत सावंत साहेब, शालेय समिती कार्याध्यक्ष ॲड.राजेंद्र रावराणे साहेब, मुख्याध्यापिका सौ .अपूर्वा सावंत मॅडम, सर्व संस्था विश्वस्त,शालेय समिती पदाधिकारी, गुरुकुल समिती पदाधिकारी,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले आहे. “शिक्षकांचे अहोरात्र कष्ट, नियोजनबद्ध सराव परीक्षा आणि विद्यार्थ्यांची जिद्द यामुळेच आम्ही सलग २४ वर्षे यशाचे हे शिखर सर करू शकलो,” अशी भावना मुख्याध्यापकांनी व्यक्त केली.

शाळेच्या या उत्तुंग यशाबद्दल कुंभवडे पंचक्रोशीतून आणि शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!