*कोंकण एक्सप्रेस*
*कुडाळमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन; विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त समाजाप्रती आपली जबाबदारी जपत सेवार्थ विद्यार्थी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबिर शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत संत राऊळ महाराज महाविद्यालय सभागृह, कुडाळ येथे आयोजित करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून मिळालेल्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करताना समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. एका रक्तदानातून गरजू रुग्णाला जीवनाची नवी आशा मिळू शकते. त्यामुळे विद्यार्थी, युवक तसेच नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन सेवार्थ विद्यार्थी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
“रक्तदान करा… जीवनदान द्या!” या भावनेतून आयोजित या शिबिरात सहभागी होऊन स्वातंत्र्यदिनाचा उत्सव एका विधायक सामाजिक कार्याने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
📅 दिनांक : १४ ऑगस्ट २०२६
⏰ वेळ : सकाळी ९ ते दुपारी १
📍 स्थळ : संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ
अधिक माहितीसाठी संपर्क : ८७६७१३९०१९ / ९०२२०७८५०३

