वरवडे सेंट उर्सुला स्कुलचा दहावीचा 100 टक्के निकाल

वरवडे सेंट उर्सुला स्कुलचा दहावीचा 100 टक्के निकाल

*कोंकण एक्सप्रेस*

*वरवडे सेंट उर्सुला स्कुलचा दहावीचा 100 टक्के निकाल*

*इंग्रजी माध्यमातही 100 टक्के यशाची परंपरा कायम ; विद्यालयाच्या उल्लेखनीय यशाबद्दल पालकांमधून समाधान*

*कणकवली ः संजना हळदिवे*

वरवडे येथील सेंट उर्सुला स्कुल या इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयाचा मार्च 2026 चा दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. विद्यालयातून परीक्षेला बसलेल्या सर्व 87 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.यामध्ये 70 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, 14 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर 3 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीत यश मिळवले. विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थी, शिक्षक व पालकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये सोनिया विलीस चोडणेकर हिने 98 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. नील चेतन नलावडे याने 97.80 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. श्राव्या विनायक मेस्त्री आणि आराध्या सुशील सावंत यांनी प्रत्येकी 97.60 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केले. विद्यालयाच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!