कणकवलीत गणेशमूर्तीची सवाद्य मिरवणूक

कणकवलीत गणेशमूर्तीची सवाद्य मिरवणूक

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवलीत गणेशमूर्तीची सवाद्य मिरवणूक*

*चौंडेश्वरी देवी, स्वामी समर्थांचा देखावा ठरला लक्षवेधी*

*कणकवली ः संजना हळदिवे*

शहरातील कांबळेगल्ली येथील श्री देवी चौंडेश्वरी मंदिरात गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. गणेशमूर्ती, कळस, कलशाची रथातून बुधवारी सायंकाळी शहरातून कोष्टी समाजबांधवांनी वाजत गाजत मिरवणूक काढली. श्री चौंडेश्वरी देवीचा व स्वामी समर्थांचा देखाव्यामुळे मिरवणूक लक्षवेधी ठरली.

सिंधुदुर्ग जिल्हा कोष्टी समाज सेवा संघातर्फे श्री चौंडेश्वरी मंदिराचा २३ वा वर्धापन दिन ८ पर्यंत या कालावधीत मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होत आहे. वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त मंदिरात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा होणार आहे. बुधवारी समाजबांधवांनी एकत्र येत शहरातून गणेशमूर्ती, कळस, कलशाची ढोल-तशांच्या गजरात मिरवणूक काढली. महिलांनी डोक्यावर कलश घेतले होते. श्री चौंडेश्वरी देवाची व स्वामी समर्थांचा देखावा लक्षवेधी ठरला. लहान मुलांसह महिलांनी लेझीम व वारकरी दिंडी नृत्य सादर करून रंगत आणली. चौंडेश्वरी माते की जय, गणपती बाप्पा मोरया अशा जयघोष करीत परिसर दणाणून सोडला. आप्पासाहेब पटवर्धन चौकातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. त्यानंतर मिरवणूक बाजारपेठ, ढालकाठी, पटकीदेवी, प. पू. भालचंद्र महाराज मठमार्गे मंदिरात दाखल झाली. देवगड तालुक्यातील विजयदुर्ग येथील ढोल पथकाने उत्कृष्ट वादन केले. कोष्टी समाजातील अबालवृद्ध आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यांच्या बाजूला नागरिकांनी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!