*_डिजिटल युगात सिंधुदुर्ग पोलीसांची झेप_*

*_डिजिटल युगात सिंधुदुर्ग पोलीसांची झेप_*

*कोंकण एक्सप्रेस*

*_डिजिटल युगात सिंधुदुर्ग पोलीसांची झेप_*

 *पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ‘सोशल मीडिया लॅब’चे लोकार्पण*

 *सिंधुदुर्गनगरी, दि.०१ (जि.मा.का):*

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत भर घालणाऱ्या ‘सोशल मीडिया लॅब’चे अनावरण आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुन्हे नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

या कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी अधीक्षक अभियंता दिनेश कुमार बागुल तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारण्यात आलेली ही अत्याधुनिक ‘सोशल मीडिया लॅब’ पोलीस यंत्रणेसाठी एक प्रभावी साधन ठरणार आहे. सोशल मीडियावरून प्रसारित होणारी माहिती, अफवा, दिशाभूल करणारे संदेश यावर लक्ष ठेवून त्यावर तात्काळ कारवाई करण्यास या लॅबमुळे मदत होणार आहे. यामुळे संभाव्य गुन्हे रोखणे, जनतेत विश्वास निर्माण करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देणे अधिक सुलभ होणार आहे तसेच सोशल मीडिया विश्लेषण, डेटा मॉनिटरिंग, तसेच गुन्हे अन्वेषणासाठी डिजिटल पुरावे संकलित करण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!