*कोंकण एक्सप्रेस*
*_जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम_*
*पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मोबाईल व्हॅनचे उद्घाटन*
*सिंधुदुर्गनगरी, दि.०१ (जि.मा.का):*
जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण आणि अनुसुचित जाती उपयोजना अंतर्गत ‘सामाजिक न्याय तसेच विविध विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची’ जनजागृती व्हावी म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या मोबाईल व्हॅनचे आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या फित कापून उद्घाटन करण्यात आले. प्रचार व प्रसिध्दी करणाऱ्या या ५ मोबाईल व्हॅन जिल्ह्यातील विविध गावांत जाऊन सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती पोहोचविणार आहेत.
पोलिस कवायत मैदानात आज हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार निलेश राणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष तुकाराम साईल, जिल्हाधिकारी तृप्ती धोडिमिसे, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मोबाईल व्हॅनव्दारे जिल्ह्यात होणाऱ्या जनजागृती व योजनांविषयीची माहिती जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी दिली. जिल्हा माहिती कार्यालयाच्या उपक्रमाविषयी पालकमंत्री नितेश राणे यांनी समाधान व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.

