सिंधुदुर्गात अत्याधुनिक हिस्टोपॅथोलॉजी प्रयोगशाळेचे लोकार्पण

सिंधुदुर्गात अत्याधुनिक हिस्टोपॅथोलॉजी प्रयोगशाळेचे लोकार्पण

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्गात अत्याधुनिक हिस्टोपॅथोलॉजी प्रयोगशाळेचे लोकार्पण;*

*कर्करोग निदानाला नवी दिशा*

*सिंधुदुर्गनगरी, दि. ०१ (जिमाका) :-*

जिल्ह्यातील आरोग्यसेवेला अधिक बळकटी देणारी महत्त्वपूर्ण पायरी म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे अत्याधुनिक हिस्टोपॅथोलॉजी प्रयोगशाळेचे लोकार्पण आज उत्साहात पार पडले. ही प्रयोगशाळा जिल्हा नियोजन समिती अंतर्गत निधीतून साकारण्यात आली असून, मत्स्यव्यवसाय व बंदरे तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते तिचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन सुरू झालेल्या या प्रयोगशाळेमुळे जिल्ह्यातील रुग्णांना कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे निदान आता अधिक जलद, अचूक आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे.

या उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम, आधुनिक आणि रुग्णाभिमुख होणार असून, ग्रामीण भागातील नागरिकांनाही उच्च दर्जाची वैद्यकीय सुविधा त्यांच्या जवळ उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!