कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व्याकरण कार्यशाळा संपन्न

कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व्याकरण कार्यशाळा संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व्याकरण कार्यशाळा संपन्न*

*कणकवली ः संजना हळदिवे*

कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी या प्रशालेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भिरवंडे गावचे सुपुत्र सध्या राहणार पुणे सन्माननीय कर्नल विजय भालचंद्र सावंत( निवृत्त )

यांनी 21 एप्रिल ते 23 एप्रिल 2026 रोजी इंग्रजी विषय व्याकरण विषयक मार्गदर्शन केले. कर्नल विजय सावंत यांचे माध्यमिक शिक्षण कुर्ला मुंबई त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे झाले. शिक्षण घेत असतानाच खडकवासला पुणे येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी( नॅशनल डिफेन्स अकॅडमी ) येथे त्यांची निवड झाली तीन वर्षाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर देहरादून इंडियन मिलिटरी अकॅडमी मध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि त्यानंतर ऑगस्ट 1964 मध्ये सैन्यात भरती झाले. सैन्यात असताना तोफखाना विरोधी कोर मध्ये त्यांनी काम केले. सेवेत असतानाच त्यांनी मद्रास विद्यापीठातून एम एस सी इन डिफेन्स स्टडी व पुणे विद्यापीठातून डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज अभ्यासक्रम पूर्ण केले.त्यानंतर त्यांनी सैन्यातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. शिकण्याचे आणि शिकवण्याची जबरदस्त आवड असून वेगवेगळ्या कॉलेजेस व माध्यमिक विद्यालयात जाऊन इंग्रजी भाषा शिकवण्याचे ते काम करत आहेत. या तीन दिवसीय कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे सखोल ज्ञान देऊन त्यांनी इंग्रजी भाषेचे महत्त्व प्रतिपादित केले. याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे.

सदर कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या विषय ज्ञानात भर पडलेली असून आजच्या जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इंग्रजी वाचता,लिहिता व बोलता येणे किती गरजेचे आहे याचे महत्त्व या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना मिळाले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण यांनी अथक प्रयत्न केले. या कार्यशाळेचे विशेष कौतुक कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्मा.श्री.सतीशजी सावंत साहेब तसेच सर्व पदाधिकारी यांनी केले व सुभेच्छा दिल्या.शालेय समिती चेअरमन सन्मा.श्री.आर.एच सावंत यांनी या कार्यशाळेला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एकूणच पणे ही कार्यशाळा उत्तम प्रकारे यशस्वी होऊन विद्यार्थ्यांनी आनंदमय वातावरणात इंग्रजी सारखा कठिण विषय सोप्या भाषेत समजून घेतला. प्रशालेतील शिक्षकांनी देखील या कार्यशाळेत सहभाग नोंदवला व आनंद व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!