कुडाळ येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान’ शिबिरास नागरิกांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान’ शिबिरास नागरิกांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

*कोंकण एक्सप्रेस*

*कुडाळ येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान’ शिबिरास नागरิกांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!*

*​कुडाळ ः प्रतिनिधी*

राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान’ शिबिराला नागरिकांचा प्रचंड व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून ३१ जुलै २०२६ रोजी कुडाळ येथील सिद्धिविनायक हॉल येथे हा महत्वपूर्ण कार्यक्रम पार पडला.
​महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ, आवश्यक दाखले, प्रमाणपत्रे व विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी सुलभपणे उपलब्ध झाल्या आहेत. लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हे शासनाच्या लोकाभिमुख, पारदर्शक आणि कार्यक्षम प्रशासनाचे खरे प्रतीक असल्याचे यावेळी प्रकर्षाने जाणवले.
​मा. आमदार श्री. निलेशजी राणे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शासनाच्या सेवा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित हा उपक्रम सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत लाभदायी ठरला आहे.
​या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रविंद्र खेबुडकर, शिवसेना उपनेते श्री. संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, महिला जिल्हा प्रमुख तथा जि.प.सदस्य सौ. दीपलक्ष्मी पडते, उपविभागीय अधिकारी सौ.ऐश्वर्या काळूसे, तहसीलदार श्री.सचिन पायील, कुडाळ पं.स. सभापती श्री. मिलिंद नाईक तसेच जिल्हा परिषद सदस्य श्री.दीपक नारकर, श्री.रूपेश कानडे, सौ. आरती पाटील, सौ. सुप्रिया वालावलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
​”जनतेची सेवा, हेच आमचे ध्येय!” या ब्रीदवाक्याप्रमाणे या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्यांवर थेट आणि प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व संयोजन शिवसेना जिल्हा सचिव तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष, कृषी आणि पशुसंवर्धन सभापती श्री. तुकाराम (दादा) शुभदा चंद्रकांत साईल यांच्या माध्यमातून करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!