*श्री. साई माऊली प्रतिष्ठानतर्फे कुंब्रल येथे विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्याचे वाटप*

*श्री. साई माऊली प्रतिष्ठानतर्फे कुंब्रल येथे विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्याचे वाटप*

*कोंकण एक्सप्रेस*

*श्री. साई माऊली प्रतिष्ठानतर्फे कुंब्रल येथे विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्याचे वाटप*

*दोडामार्ग: शुभम गवस*

श्री. साई माऊली प्रतिष्ठान (कुंब्रल–रुमडाची गोठण) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत कुंब्रल येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी वह्या व शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला.

ना.मा. श्री. आशिषजी शेलार (माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई उपनगर पालकमंत्री तथा भाजप नेते) यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या माध्यमातून इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

तसेच श्री. संजय परब (विद्यमान कुंब्रल ग्रामपंचायत सदस्य व भावी उपसरपंच) यांच्या माध्यमातून कु. तन्वी भास्कर (दिनेश) परब यांच्या वाढदिवसानिमित्त इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना कुंब्रल जिल्हा परिषद शाळा क्र. १, २, ३ व ४ येथे वह्या, पेन्सिली आणि इतर शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.

हा उपक्रम श्री. गिरीश परब (भाजप कार्यकर्ता व श्री. साई माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष) यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि शिक्षणाबाबत सकारात्मक प्रेरणा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी कुंब्रल शाळा क्र. ३ चे मुख्याध्यापक श्री. मनिपाल राऊळ, शालेय समिती अध्यक्षा सौ. भार्गवी भास्कर परब, शिक्षक श्री. शरद घाटविसावे व श्री. दत्तप्रसाद देसाई, कुंब्रल शाळा क्र. २ चे श्री. बाबुराव घोगळे (शिक्षक) व श्री. सखाराम गवस (शालेय समिती अध्यक्ष), कुंब्रल शाळा क्र. १ च्या श्रीमती मनिषा रेडकर (शिक्षिका) तसेच कुंब्रल शाळा क्र. ४ चे श्री. पदमराव पेदेवाड (शिक्षक) उपस्थित होते.

कार्यक्रमास व्यासपीठावर कुंब्रल ग्रामपंचायत सदस्य श्री. वैभव सावंत, पोलीस पाटील सौ. रेवा घोगळे, सौ. आर्या नांगरे, अंगणवाडी सेविका सौ. प्रतिक्षा देसाई, सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रकाश नाईक, कुंब्रल गावाचे माजी पोलीस पाटील श्री. सखाराम कदम, पालकवर्ग तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“ज्ञान हेच खरे बळ… विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक छोटासा प्रयत्न” या संदेशातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देत सामाजिक भान जपणारा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!