*कोंकण एक्सप्रेस*
*पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक ..*
*भगवान लोके ; सावडाव धबधबा परिसरात कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने वृक्ष लागवड*
*कणकवली ः संजना हळदिवे*
कणकवली तालुका पत्रकार संघ सातत्याने सामाजिक बांधिलकीचे उपक्रम घेवून काम करत आहेत. गेल्यावर्षी सावडाव धबधबा परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावर्षी पत्रकार संघाच्यावतीने सावडाव धबधबा परिसरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम राबवला आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक असल्याचे मत अध्यक्ष भगवान लोके यांनी व्यक्त केले.
सावडाव धबधबा परिसरात कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभ सावडाव सरपंच आर्या वारंग यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तालुका संघाचे अध्यक्ष भगवान लोके , जिल्हा उपाध्यक्ष संतोष राऊळ, उपसरपंच दत्ता काटे, सचिव संजय सावंत , खजिनदार रोशन तांबे ,जिल्हा कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत भावे , माजी अध्यक्ष रमेश जोगळे , अजित सावंत, चंद्रशेखर देसाई , महेश सरनाईक, सुधीर राणे , उमेश बुचडे , दर्शन सावंत, नितीन कदम, विशाल रेवडेकर, तुषार हजारे , तुषार सावंत, उत्तम सावंत, भाई चव्हाण, संजय बाणे , मानिक सावंत, उल्का तावडे , रंजिता तहसिलदार,संजय पेटकर व वनविभागाचे वनपाल सारिक फकीर , वनरक्षक अमोल पटेकर, अंकुश माने , स्वाती व्हनवडे, शुभम पाटील यांच्यासह तालुक्यातील पत्रकार व पत्रकारांचे कुटुंबिय , कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावडाव धबधबा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचा पर्यटनस्थळ असून, या परिसराचे नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरण अबाधित ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वाढते प्रदूषण, वृक्षतोड आणि बदलते हवामान यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. त्यामुळे वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाची गरज लक्षात घेऊन पत्रकार संघाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.पत्रकारिता क्षेत्रातून सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

