*कोंकण एक्सप्रेस*
*खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त हरकुळ खुर्द येथे ११० लाभार्थ्यांना विनामूल्य दाखल्यांचे वाटप*
*कणकवली ः संजना हळदिवे*
माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायणराव राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त जि.प.सदस्य मनोज रावराणेयांच्या सौजन्याने व भारतीय जनता पार्टी हरकुळ खुर्द यांच्या वतीने,ग्रामपंचायत हरकुळखुर्द व महसुल प्रशासन कणकवली यांच्या सहकार्यातुन ग्रा.प.हरकुळखुर्द येथे एकाच छताखाली संजय गांधी योजना लाभार्थी व विद्यार्थी यांच्यासाठी विनामोबदला उत्पन्न दाखले काढण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराचे उदघाटन १० एप्रिल रोजी जि.प.सदस्य मनोज रावराणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते.या दाखल्याचे वाटप २४ एप्रिल रोजी ग्रा.प.हरकुळखुर्दच्या सभागृहात माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सांवत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी हरकुळखुर्द सरपंच राजन रासम,उपसरपंच सर्वेश दळवी,माजी सरपंच महेश डिचवलकर,माजी उपसरपंच संजय रावले,शक्ती केंद्र प्रमुख राजेंद्र डिचवलकर,महेश दळवी ,अविनाश रासमआदि उपस्थित होते.१० एप्रिल २०२६ रोजी संपन्न झालेल्या या शिबिरात ११० संजय गांधी लाभार्थी,विद्यार्थी यांनी दाखले मिळण्यासाठी अर्ज सादर केले होते.य सर्वाचे दाखले संजय गांधी शाखा कणकवलीचे सिंगनाथ,फोडांघाट सर्कल श्री मुंडे,हरकुळखुर्द ग्राम महसुल सहायक श्रीया शिंदे,सेतु सुविधा केंद्र,यांच्या सहकार्यातुन तयार करण्यात आले होते.या संपुर्ण कार्यक्रमाचे आर्थिक सहाय्य जि.प.सदस्य मनोज रावराणे यांनी केले.हा कार्यक्रम माजी उपसरपंच संजय रावले यांनी यशस्वीरित्या राबवला.या संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रा.प.हरकुळखुर्दचे लिपिक दशरथ डोंगरे यानी केले.

