ट्रॅम्पोलिनमध्ये मंथन उकार्डेचे यश

ट्रॅम्पोलिनमध्ये मंथन उकार्डेचे यश

*कोंकण एक्सप्रेस*

*ट्रॅम्पोलिनमध्ये मंथन उकार्डेचे यश*

*कणकवली : सौ. संजना हळदिवे*

चेन्नई येथे पार पडलेल्या जिम्नॅस्टिक स्पर्धेत ट्रॅम्पोलिन खेळप्रकारात मंथन पराग उकर्डे याने यश संपादन केले. चीन येथे होणाºया आंतरराष्ट्रीय आशियाई जिम्नॅस्टिक ट्रॅम्पोलिन चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये मंथन हा सहभागी होणार आहे.
मंथन याने ट्रॅम्पोलिन या खेळ प्रकारात यश संपादन केले. तो दुसºया आशियाई ट्रॅम्पोलिन स्पर्धेच्या निवड चाचणीत सहभागी झाला होता. ही निवड चाचणी १८ व १९ एप्रिल रोजी चेन्नई येथे पार पडली. यात देशभरातून अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. मंथनने प्रथम स्थान पटकावले. मंथन हा कलमठ गावचे सुपुत्र पराग उकर्डे यांचा सुपुत्र असून कनकनगर येथील रहिवासी रश्मी हर्णे यांचा नातू आहे. लहान वयातच खेळाप्रती असलेली त्याची आवड, मेहनत आणि चिकाटीने त्याने ही यशाला गवसणी घातली आहे. याला अकॅडमी अजय क्लबचे अजय म्हापूसकर, प्रशिक्षक शुभम तांबे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मंथन याचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!