*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवलीत संत शिरोमणी सेना महाराजांच्या विचारांचा जागर*
*जयंती उत्साहात साजरी, विविध कार्यक्रम..*
*कणकवली ः संजना हळदिवे*
कणकवली तालुका नाभिक संघटनेच्यावतीने संत शिरोमणी सेना महाराज यांची जयंती संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी नाभिक समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत सेना महाराजांच्या विचारांचा जागर केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत शिरोमणी सेना महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष तथा नाभिक नेते अनिल अणावकर, जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रशेखर चव्हाण आणि ज्येष्ठ सदस्य अरुण चव्हाण यांनी मनोगतातून संत सेना महाराजांच्या जीवनावर आणि त्यांच्या समतेच्या विचारांवर प्रकाश टाकला.
या सोहळ्याला कणकवली तालुका नाभिक संघटनेचे सरचिटणीस प्रवीण कुबल, उपाध्यक्ष निलेश चव्हाण, खजिनदार मनोज चव्हाण यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य नाभिक बांधव उपस्थित होते. नाभिक समाजाची एकजूट आणि संतांनी दिलेली शिकवण आजच्या काळात कशी महत्त्वाची आहे, याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. अत्यंत मंगलमय आणि शिस्तबद्ध वातावरणात हा ज एकयंती उत्सव झाला.

