यंगस्टार चषक कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन

यंगस्टार चषक कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन

*कोंकण एक्सप्रेस*

*यंगस्टार चषक कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन*

*जि. प. माजी अध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते झाले उद्घाटन: कबड्डी सामन्यांना क्रीडारसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

*प्रतिनिधी / कणकवली*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कबड्डीच नव्हे तर सांस्कृतिक क्षेत्रातही यंगस्टार मंडळाने आपला ठसा उमटविला आहे. यंगस्टार मंडळाच्या कबड्डी स्पर्धेचा नावलौकीक राज्यात सर्वदूर पसरला आहे. या कबड्डी स्पर्धेत खेळणारे खेळाडू प्रो कबड्डीसारख्या नामवंत स्पर्धेतही उतरले आहेत. हे या मंडळाचे यश आहे. यंगस्टार मंडळाला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन जि. प. माजी अध्यक्ष, जि. प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी दिले.

परमहंस भालचंद्र महाराज संस्थाननजीकच्या प्रकाशझोतातील राज्यस्तरीय यंगस्टार चषक कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन संदेश सावंत यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी श्री. सावंत बोलत होते. उद्घाटनप्रसंगी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, न. पं. गटनेत्या सुप्रिया नलावडे, मााजी नगराध्यक्षा, नगरसेविका मेघा गांगण, प्रतिक्षा सावंत, यंगस्टारचे अण्णा कोदे, प्रियाली कोदे, अमिता राणे, माजी नगरसेवक बंडू गांगण, नामदेव जाधव, बाबू वातकर, परेश वाळके, राज नलावडे, आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने प्रकाशझोतात सुरू असलेल्या या कबड्डी स्पर्धेसाठी खास भव्य व्यासपीठ, आकर्षक अशी प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे. स्पर्धेचा अंतिम सामना रविवार १९ एप्रिल रोजी पार पडणार आहे. स्पर्धेसाठी विजेत्या संघाला ५५ हजार रुपये, उपविजेत्याला ३० हजार रुपये तसेच प्रत्येकी यंगस्टार चषक देण्यात येणार आहे. याशिवाय तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी ५०३० रुपये, अष्टपैलू खेळाडूसाठी २५३० रुपये, उत्कृष्ट खेळाडू, चढाई, शिस्तबद्ध संघ यासाठी प्रत्येकी १५३० रुपये, प्रत्येकी चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेचे हे ३० वे वर्ष आहे स्पर्धेत कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली आदी विविध जिल्ह्यातून संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेला क्रीडा रसिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. स्पर्धेतील सामनेही रोमहर्षक होत असून नावाजलेल्या क्रीडापटूंचा खेळ पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!