*कोंकण एक्सप्रेस*
*विनिता घाडी यांच्या प्रचाराला वेग; झरेबांबर मतदारसंघात ‘मशाल’ पेटवण्याची जबाबदारी*
*दोडामार्ग: शुभम गवस*
झरेबांबर मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार सौ. विनिता घाडी यांच्या प्रचाराला सध्या वेग आला असून त्या गावपातळीवर उतरून थेट जनतेशी संवाद साधत आहेत. आपल्या कार्यकाळात केलेल्या कामांचा अजेंडा त्या मतदारांसमोर मांडत असून त्यामुळे जनतेत सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे.
पिकुळे येथे माहेर असल्यामुळे या भागात त्यांना विशेष पाठिंबा मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. पक्षाची ‘मशाल’ पेटवण्याची जबाबदारी सौ. विनिता घाडी यांच्यावर सोपवण्यात आली असून त्या शिवसेनेच्या महिला उपजिल्हा प्रमुख पदाची जबाबदारीही समर्थपणे पार पाडत आहेत.
गावपातळीवर विविध प्रश्नांसाठी त्यांनी केलेली आंदोलने, उपोषणे आणि जनहितासाठी घेतलेली ठाम भूमिका हे त्यांच्या प्रभावी नेतृत्वाचे ठळक उदाहरण मानले जात आहे. त्यामुळे झरेबांबर मतदारसंघातील लढत अधिक चुरशीची होत असल्याचे चित्र आहे.

