सौं.सोनाली सुनिल गवस यांचा कोनाळ पंचायत समिती प्रचार जोरात; गावोगावून जनतेशी संपर्क..

सौं.सोनाली सुनिल गवस यांचा कोनाळ पंचायत समिती प्रचार जोरात; गावोगावून जनतेशी संपर्क..

*कोंकण एक्सप्रेस*

*सौं.सोनाली सुनिल गवस यांचा कोनाळ पंचायत समिती प्रचार जोरात; गावोगावून जनतेशी संपर्क..*

*दोडामार्ग: शुभम गवस*

कोनाळ पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार सौं सोनाली सुनिल गवस यांचा प्रचार जोमात सुरू आहे. सध्या सरपंच गाव मोजे तेरवण,तेरवण मेढे,सोनावल, पाळये. गावाच्या संरपच म्हणून कार्यरत असलेल्या सौं गवस यांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर मतदारांच्या मनावर ठसा उमठवला आहे.
तेवढेच नाही तर, त्या आपल्या मतदार संघातील गावोगाव भेट देत, जनतेशी थेट संवाद साधत आहेत. त्यांच्या भेटी दरम्यान स्थानिक समस्यांना समजून घेणे, गावकऱ्यांच्या अडचणी ऐकणे आणि त्यावर उपाययोजना सुचवणे यावर त्यांचा विशेष भर आहे. त्यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास आणि अपेक्षा वाढत आहेत.
सौं गवस यांची कार्यशैली आणि लोकसंपर्काच्या पद्धतीमुळे कोनाळ पंचायत समितीतील मतदार संघात त्यांच्या बाजूने वातावरण निर्माण होत आहे. शिवसेना कार्यकर्ते आणि स्थानिक समाजातील युवक-स्त्रियांचा सहभागही प्रचारात मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, त्यांच्या सकारात्मक वृत्ती, विकासकामांवरील दृढनिश्चय आणि लोकांशी असलेला संवाद हेच त्यांना इतर उमेदवारांपेक्षा वेगळे ठरवित आहे. आगामी निवडणुकीत या सर्व गोष्टी सौं सोनाली गवस यांच्या बाजूने निर्णायक ठरू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!