विद्यामंदिर कणकवलीची जिल्हा शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धेत चमकदार कामगिरी

विद्यामंदिर कणकवलीची जिल्हा शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धेत चमकदार कामगिरी

*कोंकण एक्सप्रेस*

*विद्यामंदिर कणकवलीची जिल्हा शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धेत चमकदार कामगिरी*

*कणकवली : प्रतिनिधि*

ओरोस येथे पार पडलेल्या जिल्हा स्तरीय बॉलबडमिंटन स्पर्धेत विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीच्या संघांनी चमकदार कामगिरी केली.
17 वर्षाखालील मुली- प्रथम क्रमांक,
17 वर्षाखालील मुलगे- द्वितीय क्रमांक,
14 वर्षाखालील मुली- द्वितीय क्रमांक,
14 वर्षाखालील मुलगे- द्वितीय क्रमांक
17 वर्षाखालील मुलीच्या संघाची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या संघात लक्ष्मी शेटे, प्राची पालकर,
हर्षाली पातेरे,
कर्तुत्वा हरकुळकर,
भूमी मगम,
दुर्वा कुडाळकर,
दिव्या तावडे,
वैष्णवी माने,
निधी सातार्डेकर,
तन्वी सावंत हे खेळाडू आहेत. यशस्वी खेळाडूंना प्रशालेचे क्रीडा शिक्षक अच्युतराव वनवे, सुदिन पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. वरील सर्व यशस्वी खेळाडूंचे शि.प्र. मं. कणकवलीच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, अध्यक्ष दत्तात्रय तवटे, सेक्रेटरी बाळासाहेब वळंजू , ट्रस्टी अनिलपंत डेगवेकर, मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे, पर्यवेक्षक अच्युतराव वनवे व शिक्षकवृदांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!