*कोंकण एक्सप्रेस*
*प.स समिती व जि.प जिंकण्यासाठी शिवसैनिक सज्ज :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दोडामार्ग तालुका प्रमुख- संजय गवस*
*दोडामार्ग/ शुभम गवस*
तालुक्यात जि.प.व प.समिती निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ताकदीने लढणार असून.. दोडामार्ग प.स समिती वर भगवा फडकविणार असल्याचे मत शिवसेना तालुकाप्रमुख संजय गवस यांनी व्यक्त केले आहे… तसेच जि.प.मतदार संघात सक्षम उमेदवार रिंगणात उतरणार असून, तिन्ही जि.प मतदार संघ शिवसेना ताकदीने लढणार आहे.. उमेदवारांची चाचपणी सुरू असून..माटणे जि.प.मतदार संघात स्वतः इच्छूक असून ..पक्षाने संधी दिल्यास .. या मतदारसंघात गेल्या दहा वर्षांत झालेले दुर्लक्ष..जनता निश्चितच परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.. त्यामुळे आपण जि.प साठी निश्चितच विजय प्राप्त करणार आहे.. त्यामुळे प.स समिती व जि.प जिंकण्यासाठी शिवसैनिक सज्ज असल्याचे संजय गवस यांनी सांगितले..

